'व्हॅलेंटाईन डे' ला जोडप्यांनी कॅम्पसमध्ये फिरू नये; विद्यापीठाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 02:18 PM2018-02-14T14:18:38+5:302018-02-14T14:19:14+5:30
पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे.
Next
लखनऊ: देशभरात तरुणाईकडून 'व्हॅलेंटाईन डे' उत्साहात साजरा होत असताना लखनऊ विद्यापीठाचा एक निर्णय देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात फिरू नये, असे पत्रकच विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे.
Lucknow University closed its doors for students after issuing an advisory yesterday that students will not be allowed to roam inside the university premises on Valentine's Day. pic.twitter.com/YPj10K5tuM
— ANI UP (@ANINewsUP) February 14, 2018
यंदा व्हॅलेंटाईन डे आणि महाशिवरात्री एकाच दिवशी आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा आदेश काढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. यासाठी अनेकजण विद्यापीठाच्या आवारात जमतात. मात्र, यंदा 14 फेब्रुवारीला महाशिवरात्री आल्याने विद्यापीठाला सुट्टी देण्यात आली आहे. या काळात कोणत्याही अभ्यासक्रमांचे वर्ग आणि प्रयोग परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे या काळात विद्यापीठाच्या परिसरात कोणालाही प्रवेश नसेल. पालकांनीही त्यांच्या मुलांना विद्यापीठाच्या आवारात पाठवू नये. या काळात कोणताही मुलगा किंवा मुलगी विद्यापीठाच्या परिसरात फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला.