गाळे प्रकरणी शासनाचे म्हणणे सादर न्यायालय: १३ एप्रिलला कामकाज

By admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:42+5:302016-04-05T00:15:42+5:30

जळगाव : महापालिकेतील ठराव क्रमांक १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे सोमवारी आपले म्हणणे सादर करण्यात आले. याचिकाकर्त्यांना आपलेे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने १३ एप्रिल ही तारीख ठेवली आहे.

Court adjourns the verdict in court case: Functioning on April 13 | गाळे प्रकरणी शासनाचे म्हणणे सादर न्यायालय: १३ एप्रिलला कामकाज

गाळे प्रकरणी शासनाचे म्हणणे सादर न्यायालय: १३ एप्रिलला कामकाज

Next
गाव : महापालिकेतील ठराव क्रमांक १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे सोमवारी आपले म्हणणे सादर करण्यात आले. याचिकाकर्त्यांना आपलेे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने १३ एप्रिल ही तारीख ठेवली आहे.
महापालिकेतील ठराव क्रमांक १३५ बाबत निर्णय घेण्यात शासनातर्फे झालेली दिरंगाई तसेच गाळ्यांसंदर्भात दाखल वेगवेगळ्या याचिकांवर एकत्रित कामकाजाचे उच्च न्यायालयाचे निर्देश होते. त्यानुसार आज हे कामकाज न्या. संभाजी शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांच्या बेंचसमोर झाले.
सरकारतर्फे कामकाज पहाण्यासाठी ॲड. आर. एन. धोर्डे पाटील यांची निवड केली आहे. सरकारपक्षातर्फे ते हजर होते. त्यांनी सरकारचे म्हणणे सादर केले. १३५ क्रमांकाच्या ठरावावर न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने निर्णय घेतला आहे. १४ मार्केटवर निर्णय घेण्यास मनपास सूचित करण्यात आले असून चार मार्केटप्रकरणी यथावकाश निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आलेे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास १३ एप्रिल ही तारीख न्यायालयाने दिली आहे. याचिका दाखल करणारे डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यातर्फे न्यायालयात ॲड. विनोद पाटील हे कामकाज पहात आहेत.

Web Title: Court adjourns the verdict in court case: Functioning on April 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.