समझोता खटल्यासाठी सीमेवर न्यायालय?

By admin | Published: December 24, 2016 01:33 AM2016-12-24T01:33:16+5:302016-12-24T01:33:16+5:30

भारत व पाकिस्तानच्या सीमारेषा अनेक युद्धांच्या साक्षीदार आहेत. आता मात्र त्यातील एका सीमारेषेवर वेगळीच लढाई

Court on the border for a settlement case? | समझोता खटल्यासाठी सीमेवर न्यायालय?

समझोता खटल्यासाठी सीमेवर न्यायालय?

Next

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानच्या सीमारेषा अनेक युद्धांच्या साक्षीदार आहेत. आता मात्र त्यातील एका सीमारेषेवर वेगळीच लढाई पाहायला मिळणार आहे. ही लढाई असणार आहे कायद्याची. समझोता एक्स्प्रेसमध्ये २00७ साली झालेल्या स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तात्पुरते न्यायालय उभारण्याचा विचार करत आहे. यासाठी लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचे समजते.
समझोता एक्स्प्रेस स्फोटाचे साक्षीदार असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची चौकशी करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. त्यांना न्यायालयात येणे सोपे जावे, यासाठी हा विचार सुरू असल्याचे कळते. गृह मंत्रालयाने एनआयएला न्यायालय उभारण्याठी परवानगी दिली तर, एखाद्या घटनेच्या सुनावणीसाठी सीमारेषेवर प्रथमच न्यायालय निर्माण होईल. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांनी एनआयएच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर यासंबंधी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एनआयएचे महासंचालक जनरल शरद कुमार यांनी दिली. असे न्यायालय उभारण्यापूर्वी देशाच्या सुरक्षेचा विचार करणेही आवश्यक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Court on the border for a settlement case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.