चारा घोटाळा प्रकरणी युक्तिवाद पूर्ण, लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेवर उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 12:46 PM2018-01-05T12:46:34+5:302018-01-05T17:16:51+5:30
चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना उद्या शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे
रांची - चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना उद्या शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. आज युक्तिवाद पुर्ण झाला आहे. उद्या दुपारी 2 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी सकाळीही लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र, त्यांना सुनावण्यात येणारी शिक्षा टळली आणि त्यांची पुन्हा रांचीमधील बिरसा मुंडा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह 15 दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या वकिलाने रांची विशेष सीबीआय न्यायालयात याचिका केली असून, तब्बेतीच्या कारणामुळे कमीत कमी शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे.
Sentence will be announced at 2 pm, tomorrow, via video conferencing: Chittaranjan Sinha, #LaluPrasadYadav's lawyer #FodderScamVerdictpic.twitter.com/JyBijWmowc
— ANI (@ANI) January 5, 2018
"Lalu Prasad Yadav has blessings of the almighty and we have faith that he will get justice. I am sure our Chief Lalu ji will attend RJD's crucial meeting tomorrow" says Bihar party chief Ramchandra Purve pic.twitter.com/PnNjhCZIrq
— ANI (@ANI) January 5, 2018
शिक्षा का टळली?
लालू प्रसाद यादव यांना गुरुवारी सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र, कोर्टात A पासून K पर्यंतची नावे असलेल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार होती, त्यामुळे लालूंच्या शिक्षेची सुनावणी आज होणार आहे. A पासून K पर्यंत नावे असलेले चार आरोपी कोर्टात हजर झाले होते. त्यामुळे त्यांची शिक्षा गुरुवारी टळली. दरम्यान, गेल्या बुधवारी लालू प्रसाद यादव व इतर दोषी रांचीच्या सीबीआय विशेष कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी पण त्यांच्या शिक्षेवरील सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली. वकील विंदेश्वरी प्रसाद यांचे निधन झाल्याने शिक्षेवरील सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती.
चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय ?
चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.
लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्री पद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलंहोतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलिही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.
चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.