IRCTC Scam Case: लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना कोर्टाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:01 AM2019-01-28T11:01:10+5:302019-01-28T11:01:34+5:30
आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्याचे पुत्र तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून नियमित जामीन मिळाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टूरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) टेंडर घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, राजद नेते तेजस्वी यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने या तिघांचा जामीन मंजूर केला आहे.
आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्याचे पुत्र तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून नियमित जामीन मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने एक लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर या तिघांचा जामीन मंजूर केला आहे. तसेच, याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 फेब्रुवारीला होणार आहे.
Former Bihar CM Lalu Prasad Yadav, his wife Rabri Devi, son Tejashwi Yadav and others have been granted regular bail on a personal bond of Rs 1 Lakh and a surety amount each. Next date of hearing is 11 February. https://t.co/yIBvvsWYo6
— ANI (@ANI) January 28, 2019
दरम्यान, आयआरसीटीसीची दोन हॉटेल्स खासगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या कंत्राटात झालेल्या कथित गैरव्यवहारांशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते.
Tejashwi Yadav on being granted regular bail in IRCTC scam case: We are confident of getting justice. We trust the judiciary. pic.twitter.com/pe1ycSBkih
— ANI (@ANI) January 28, 2019