तरुणीसोबत हॉटेलबाहेर पडलेले मेजर गोगोई अडकले; शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:06 PM2018-08-27T13:06:28+5:302018-08-27T13:33:09+5:30

मेजर गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार

Court of Inquiry in respect to Major Leetul Gogoi has ordered to initiate disciplinary action | तरुणीसोबत हॉटेलबाहेर पडलेले मेजर गोगोई अडकले; शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

तरुणीसोबत हॉटेलबाहेर पडलेले मेजर गोगोई अडकले; शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

नवी दिल्ली: श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर तरुणीसोबत असताना अटक करण्यात आलेल्या मेजर लितुल गोगोई यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. कर्तव्यावर असताना गोगोई त्यांना नेमून देण्यात आलेल्या हद्दीच्या बाहेर होते. त्यामुळे न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. याशिवाय मेजर गोगोई यांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांविरोधात जाऊन स्थानिकांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. याबद्दलही न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. 




याचवर्षी 23 मे रोजी भारतीय लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या गोगोई यांना श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममताच्या बाहेरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी गोगोई बडगाममधील एका तरुणीसोबत होते. या प्रकरणात गोगोई यांच्या चौकशीचे आदेश लष्कराकडून देण्यात आले होते. मेजर गोगोई स्थानिक तरुणीसोबत हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांचा हॉटेल व्यवस्थापनाशी वाद झाला. यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी हॉटेलच्या बाहेरुन मेजर गोगोई आणि तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आयजीपींनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश श्रीनगर विभागाचे एसपी सज्जाद शाह यांना दिले होते. 



 

Web Title: Court of Inquiry in respect to Major Leetul Gogoi has ordered to initiate disciplinary action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.