शस्त्रक्रिया प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

By admin | Published: November 14, 2014 02:34 AM2014-11-14T02:34:30+5:302014-11-14T02:34:30+5:30

13 महिलांच्या मृत्यूनंतर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सहन कराव्या लागणा:या छत्तीसगड सरकारने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत़

The court inquiry of the surgery case | शस्त्रक्रिया प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

शस्त्रक्रिया प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

Next
बिलासपूर : कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या 13 महिलांच्या मृत्यूनंतर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सहन कराव्या लागणा:या छत्तीसगड सरकारने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत़
दरम्यान, शिबिरात काही तासांत 83 महिलांची नसबंदी करणारे मुख्य शल्यविशारद डॉ़ आऱ के.गुप्ता यांना अटक करण्यात आली असून पीडितांना कथितरीत्या निकृष्ट दर्जाची औषधे पुरविणा:या रायपूरस्थित महावर फार्मा प्राय़ लि़ कंपनीच्या कार्यालयास सील ठोकण्यात आले आह़े
 बिलासपूर जिल्ह्याच्या पेंडारी गावात चार दिवसांपूर्वी आयोजित शिबिरात 83 महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  उपचारादरम्यान यापैकी 13 महिलांचा मृत्यू झाला आह़े अद्यापही 49 महिला रुग्णालयात आहेत़ 
या प्रकरणी छत्तीसगड सरकारने गुप्ता यांच्यासह चार वैद्यकीय अधिका:यांना निलंबित करीत डॉ़ गुप्तांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता़ बुधवारी रात्री उशिरा गुप्ता यांना अटक करण्यात आली़ 
गुरुवारी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल़े शस्त्रक्रिया झाल्यानंतर आजारी झालेल्या आणि वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या 52 महिलांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली़ यापैकी दोन महिला व्हेंटिलेटरवर आहेत़ तिघी जणींचे डायलिसिस सुरू असल्याचे त्यांनी सांगितल़े  
दरम्यान, भारतात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 13 महिलांचा मृत्यू होण्याची घटना चिंताजनक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख बान की मून यांनी म्हटले आहे.  (वृत्तसंस्था)
 
 
 
 
मी गेल्या अनेक वर्षापासून नसबंदीच्या शस्त्रक्रिया करीत आह़े यादरम्यान मी सुमारे 5क् हजार महिलांची नसबंदी केली आह़े इतक्या वर्षाच्या काळात असे कधीही घडले नाही़ शस्त्रक्रियेपूर्वी साहित्य पूर्णत: निजर्तुक करण्यात आले होत़े खरेदी करण्यात आलेल्या औषधांची योग्य तपासणी करण्यात आली नव्हती़ चांगल्या कंपनीची औषधे दिली गेली असती तर आज ही घटना घडली नसती़ मीडियातील बातम्यांनुसार, शिबिरासाठी स्थानिक औषधे पुरविण्यात आली होती, असेही ते म्हणाल़े
 
 कोट
मला या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अन्य वैद्यकीय अधिकारी निलंबित आहेत़ त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी़ प्रशासन स्वत:ला वाचविण्यासाठी मला फसवत आह़े
-डॉ़ आऱ के.गुप्ता, नसबंदी शस्त्रक्रिया करणारे मुख्य डॉक्टर
 
  
 
4छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात शस्त्रक्रियेनंतर 13 महिलांच्या मृत्यूप्रकरणी काल बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आलेले डॉ़ आऱ के. गुप्ता यांनी पीडित महिलांचा मृत्यू कथितरीत्या निकृष्ट औषधांमुळे झाल्याचा दावा केला आह़े आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आह़े
 
4शस्त्रक्रियेनंतर महिलांना आयब्रुफेन आणि सिप्रोक्सिन ही वेदनाशामक आणि अॅन्टिबायोटिक औषधे देण्यात आली होती़ औषधे घेतल्यानंतर महिलांना उलटय़ा, पोटदुखी व डोकेदुखी सुरू झाली़ यावरून महिलांचा मृत्यू संदिग्ध गुणवत्तेच्या औषधांमुळे झाल्याचे दिसते, असे गुप्ता म्हणाल़े 

 

Web Title: The court inquiry of the surgery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.