गोलाणीप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश न्यायालय: तीन महिन्यांची मुदत

By admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:03+5:302016-03-22T00:41:03+5:30

जळगाव : गोलाणी मार्केट व सतरा मजलीतील अनियमिततेबाबत आयुक्त संजय कापडणीस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीप्रकरणी तीन महिन्यात चौकशी करून कारवाई करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले.

Court order to investigate round-the-clock: Three months deadline | गोलाणीप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश न्यायालय: तीन महिन्यांची मुदत

गोलाणीप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश न्यायालय: तीन महिन्यांची मुदत

Next
गाव : गोलाणी मार्केट व सतरा मजलीतील अनियमिततेबाबत आयुक्त संजय कापडणीस यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीप्रकरणी तीन महिन्यात चौकशी करून कारवाई करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी दिले.
महापालिकेचे आयुक्त संजय कापडणीस यांनी याप्रश्नी शहर पोलिसांकडे गोलाणी मार्केट व सतरा मजली इमारतीच्या कामात झालेल्या अनियमितेबद्दल २२ पानी तक्रार दिली होती. याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने भाजपाचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर अशोक लाडवंजारी यांच्यातर्फे ॲड. जतीन काळे यांनी कामकाज पाहीले. सरकारतर्फे ॲड. नेरलीकर यांनी युक्तीवाद केला. न्या. निरगुडे व न्या. इंदिरा जैन यांच्या खंडपीठाकडे या जनहित याचिकेवर कामकाज सुरू होते.
चौकशी करून कारवाई
याप्रश्नी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आज निर्णय दिला. शासनाने तीन महिन्यांच्या आत चौकशी करून कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

Web Title: Court order to investigate round-the-clock: Three months deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.