संघप्रमुखांच्या सभेला न्यायालयाची परवानगी
By Admin | Published: January 13, 2017 04:37 PM2017-01-13T16:37:25+5:302017-01-13T16:37:25+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 14 जानेवारी रोजी कोलकात्यात होणाऱ्या सभेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 13 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 14 जानेवारी रोजी कोलकात्यात होणाऱ्या सभेला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली आहे. येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर संघाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली.
14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर संघ येथील ब्रिगेड परेड मैदानात सभेचे आयोजन करणार आहे. तसेच, याठिकाणी संघ स्वयंसेवकांचे संचलन व त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रबोधन होणार आहे.
संघाने आधी भूकैलाश ट्रस्ट या खासगी ट्रस्टचे मैदान घेतले होते, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. नंतर लष्कराकडून परेड मैदान घेतले, पण तेथील कार्यक्रमासही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, यावर संघाने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने काही अटींवर सभेला परवानगी दिली आहे.
Kolkata HC grants permission to hold rally of Mohan Bhagwat on Jan 14th at Central Kolkata's Brigade Parade Ground,impose certain conditions
— ANI (@ANI_news) January 13, 2017