न्यायालयाच्या आवारात सासर्याकडून सुनेला बेदम मारहाण
By Admin | Published: July 20, 2016 11:48 PM2016-07-20T23:48:42+5:302016-07-20T23:48:42+5:30
जळगाव : केस मागे घेण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या सासर्याने सुनेसह तिच्या आईला न्यायालयाच्या आवारातच शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीजवळ घडली. याप्रकरणी मारहाण करणार्या सासर्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे.
ज गाव : केस मागे घेण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या सासर्याने सुनेसह तिच्या आईला न्यायालयाच्या आवारातच शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीजवळ घडली. याप्रकरणी मारहाण करणार्या सासर्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध न्यायालयात खावटीचा दावा दाखल केलेला आहे. यासंदर्भात बुधवारी दुपारी न्यायालयीन कामकाजासाठी ती महिला तिच्या आईसह आलेली होती. तर दुसरीकडे तिच्या सासरची मंडळीदेखील न्यायालयात आलेली होती. ही केस मागे घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद उद्भवला. त्यात महिलेच्या सासर्याने तिला वाईट शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्या महिलेच्या आईलादेखील मारहाण करण्यात आली. न्यायालयाच्या आवारातील पोलीस चौकीतील पोलिसांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला. त्यानंतर महिलेने तिच्या सासर्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला. या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.