सर्वसाधारण सभा घेण्यास न्यायालयाची मनाई
By admin | Published: August 28, 2015 11:37 PM2015-08-28T23:37:17+5:302015-08-28T23:37:17+5:30
सोलापूर : कोणताही अधिकार नसताना रहिमा कारीगर यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. बोलावलेली युनियन एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा घेण्यास दिवाणी न्यायाधीश के.के. घुले यांनी मनाई दिली.
Next
स लापूर : कोणताही अधिकार नसताना रहिमा कारीगर यांनी दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. बोलावलेली युनियन एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा घेण्यास दिवाणी न्यायाधीश के.के. घुले यांनी मनाई दिली. रहिमा कारीगर या संस्थेच्या सचिव नव्हत्या. त्या संस्थेच्या सेक्रेटरी असल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. धर्मादाय आयुक्तांकडे सेक्रेटरी असल्याची नोंद नाही. मी संस्थेचा 20 वर्षांपासून उपाध्यक्ष आहे. तशी नोंद न्यासाच्या परिशिष्ट-1 वर नोंद आहे. माझ्या परवानगीशिवाय कुठलीही सभा घेता येणार नाही. रहिमा कारीगर यांना कसलाही अधिकार नसताना मिटिंग घेण्याबाबत मनाई करणे गरजेचे आहे, असा दावा संस्थेचे उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष साहेबलाल वळसंगकर यांनी दाखल केला आहे. यावर दिवाणी न्यायाधीश के.के. घुले यांनी मनाईचा आदेश दिला. या प्रकरणी वादीतर्फे अँड. इनायत अली शेख, अँड. ए.एम. रामपुरे, अँड. एन.व्ही.जमखंडी यांनी तर रहिम कारीगरतर्फे अँड. एच.बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)