सेक्सलाईफ उघड करणारी आकांक्षा युवराजच्या भावाला खेचणार कोर्टात
By admin | Published: May 31, 2017 01:28 PM2017-05-31T13:28:34+5:302017-05-31T13:32:03+5:30
वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करणा-या आकांक्षा शर्माने आता झोरावर सिंग विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - बिग बॉस 10 मध्ये सहभागी होऊन आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करणा-या आकांक्षा शर्माने आता झोरावर सिंग विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. झोरावर सिंग युवराज सिंगचा भाऊ आहे. युवराजच्या घरात आपल्याला अमानवीय वागणूक दिली जायची असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
बॉलिवूडपापा डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार आकांक्षा झोरावर विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. लग्न मोडण्यासाठी आकांक्षा शर्माने सासूबाई शबनम सिंग यांना जबाबदार धरले होते. झोरावर आणि मी शारीरीक आणि मानसिक दृष्टया कधीही एकत्र येऊ शकलो नाही. आम्ही दोघे जेव्हा एकत्र बाहेर जायचो. तेव्हा सासूबाई नेहमी आमच्यासोबत असायच्या. हात पकडा, किस करा अशा त्या सूचना करायच्या. सांगून अशा गोष्टी होतात का ? हे नैसर्गिकपणे घडून आले पाहिजे असे आकांक्षाने मुलाखतीत म्हटले होते.
आणखी वाचा
झोरावरला आकांक्षा बरोबर सामंजस्याने अलग व्हायचे नाहीय. त्याला आकांक्षाला काहीही द्यायचे नाहीय अशी माहिती आकांक्षाच्या वकिलाने दिली. या प्रकरणात आर्थिक आणि भावनिक दोन्ही आधारांवर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करता येऊ शकतो. घरात तीन स्वयंपाकी असतानाही आकांक्षा सकाळी पाच वाजता उठून चहा करायला सांगितला जायचा. तिला रोजच्या खर्चासाठी झोरावर किंवा त्याच्या कुटुंबाकडून एकही पैसा दिला जात नव्हता अशी माहिती आकांक्षाच्या वकिलाने दिली.
गुरगाव येथे राहणा-या आकांक्षाचे काहीवर्षांपूर्वी झोरावरबरोबर लग्न झाले होते. दुर्देवाने त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि अवघ्या चार महिन्यात ते विभक्त झाले. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पॉटबॉय कॉमला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षाने आमची सेक्सलाईफही खूप निराशाजनक होती असे सांगितले. त्याने माझ्यावर प्रेम केले पाहिजे. मला जवळ घेतले पाहिजे. "चल आपण सेक्स करु" असे मी सांगू शकत नाही. आम्ही एकाच बिछान्यावर दोघे झोपायचो पण आमच्यामध्ये उशी असायची. झोरावर खूप वाईट पद्धतीने घोरते त्यामुळे मी माझी झोपण्याची जागा बदलली असे आकांक्षाने सांगितले.