धुळ्याचे माजी नगराध्यक्ष गलाणींसह तिघांना जामीन नाकारला न्यायालय : आइसक्रीम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण
By Admin | Published: May 31, 2016 01:55 AM2016-05-31T01:55:42+5:302016-05-31T01:55:42+5:30
जळगाव : येथील आइसक्रीम व्यावसायिक अण्णासा वामनसा क्षत्रिय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा धुळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रमल गलाणी यांच्यासह तिघांना ३० रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला.
ज गाव : येथील आइसक्रीम व्यावसायिक अण्णासा वामनसा क्षत्रिय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा धुळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रमल गलाणी यांच्यासह तिघांना ३० रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला.अण्णासा क्षत्रिय यांनी त्यांच्या बांभोरी येथील गोदामात स्वत:च्या अंगावर रसायन टाकून, पेटवून घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीही (सुसाइड नोट) लिहून ठेवली होती. याप्रकरणी क्षत्रिय यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ात जामीन मिळावा, म्हणून संशयित आरोपी चंद्रमल गलाणी, राजेश गलाणी व गोविंदमल दुसेजा उर्फ बटाटेवाला यांनी न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, मूळ फिर्यादीतर्फे ॲड.के.बी. वर्मा यांनी तर संशयितांतर्फे ॲड.अकील इस्माइल यांनी कामकाज पाहिले.