पश्चिम बंगालमधील २० हजारांहून जादा जागांच्या पंचायत निवडणुका रद्द करण्यास कोर्टाचा नकारच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:06 AM2018-08-25T05:06:55+5:302018-08-25T05:07:29+5:30
पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे खवळलेल्या भाजपा, माकपच्या याचिका केल्या होत्या. त्या सर्व न्यायालयाने फेटाळल्या.
भाजपा, माकपच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; तृणमूल काँग्रेसला दिलासा
या जागांवर आमचे उमेदवार उभे करण्यात अनंत अडचणी निर्माण केल्या गेल्या, असा आरोप विरोधकांनी तृणमूल काँग्रेसवर केला होता. या निवडणुकांतील विरोधी पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक निकाल मान्य नसल्यास, ते त्या विरोधात ३० दिवसांत संबंधित न्यायालयात याचिका दाखल करू शकतात, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा व न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. पंचायत निवडणुकांसाठी ईमेल किंवा व्हॉट्सअप मार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा निर्णय भाजपाने मान्य केला आहे, तर ‘हा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय आहे' अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसने स्वागत केले आहे.