दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्यास सीबीएसईला कोर्टाचा ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:58 AM2020-06-27T03:58:28+5:302020-06-27T03:58:39+5:30

आयसीएसई बोर्डाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचीही सीबीएसईशी मिळतीजुळती योजना आहे. मात्र, यात सरासरी गुणांचा फॉर्म्युला वेगळा आहे.

Court's green signal to CBSE to cancel 10th, 12th exams | दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्यास सीबीएसईला कोर्टाचा ग्रीन सिग्नल

दहावी, बारावी परीक्षा रद्द करण्यास सीबीएसईला कोर्टाचा ग्रीन सिग्नल

Next

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि सीबीएसईला परवानगी दिली आहे. न्या. ए.एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सीबीएसईला परीक्षा रद्द करण्यासाठी एक अधिसूचना जारी करण्यास परवानगी दिली. केंद्र आणि सीबीएसईकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मूल्यांकन योजना बोर्ड परीक्षांच्या गत तीन विषयांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे असेल. आयसीएसई बोर्डाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांचीही सीबीएसईशी मिळतीजुळती योजना आहे. मात्र, यात सरासरी गुणांचा फॉर्म्युला वेगळा आहे.
>आम्ही दहावीच्या पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विचार करू शकतो. याबाबत एका आठवड्याच्या आत अधिसूचना जारी केली जाऊ शकते आणि वेबसाईटवर अपलोड केली जाईल.
सीबीएसई आणि आयसीएसई यांनी न्यायालयाला सांगितले की, दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल जुलैच्या मध्यापर्यंत घोषित करण्यात येतील.
>काय आहे
मूल्यांकन योजना?
न्यायालयाने सीबीएसईच्या ज्या मूल्यांकन योजनेला मंजुरी दिली आहे त्यानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे घोषित करण्यात येतील. यात म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा अधिक विषयांत परीक्षा दिली आहे आणि त्यांना ज्या तीन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले आहेत त्याचे सरासरी गुण न झालेल्या विषयांसाठी दिले जातील. जे विद्यार्थी केवळ तीन विषयांत परीक्षेला बसले असतील त्यांना ज्या दोन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले असतील त्याच्या सरासरी गुणांइतके गुण परीक्षा न झालेल्या विषयांसाठी दिले जातील.
>सीबीएसईच्या
बारावीच्या बोर्ड परीक्षा
15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या आणि त्या एप्रिलमध्ये समाप्त होणार होत्या. दहावीच्या परीक्षा
21 फेब्रुवारीला सुरू झाल्या होत्या आणि २९ मार्चला समाप्त होणार होत्या. आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या.

Web Title: Court's green signal to CBSE to cancel 10th, 12th exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.