महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ न्यायालयाचे मत
By admin | Published: March 28, 2016 12:46 AM2016-03-28T00:46:38+5:302016-03-28T00:46:38+5:30
महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कसलीही भीती नाही आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे मत व्यक्त करून दिल्लीचे विशेष न्यायाधीश संजीव
Next
नवी दिल्ली : महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कसलीही भीती नाही आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे मत व्यक्त करून दिल्लीचे विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी एका २० वर्षांच्या तरुणाला महिलेच्या विनयभंगाच्या आरोपात एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
आरोपीचे वय २० वर्षे आहे आणि तो त्याच्या घरातील एकमेव कमावता पुरुष आहे, हे लक्षात घेऊन न्या. अग्रवाल यांनी त्याला एक वर्षाची शिक्षा ठोठाविण्यात येत असल्याचे सांगितले. या शिक्षेसोबतच न्यायालयाने त्याला १,५०० रुपयांचा दंडही ठोठावला. (लोकमत न्यूज नेटवर्क)