गोहत्येवर बंदीचा आदेश देण्यास कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:00 AM2023-07-19T07:00:55+5:302023-07-19T07:01:19+5:30

ते विधिमंडळाचे काम : सर्वोच्च न्यायालय

Court's refusal to order ban on cow slaughter | गोहत्येवर बंदीचा आदेश देण्यास कोर्टाचा नकार

गोहत्येवर बंदीचा आदेश देण्यास कोर्टाचा नकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  गोहत्येवर बंदी आणण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. गोहत्याबंदीसारखे निर्णय घेणे हे विधिमंडळाचे काम आहे. तसेच न्यायालय विधिमंडळाला विशिष्ट कायदा करण्यासाठी भाग पाडू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. 
यासंदर्भातील अपील सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक व न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने निकाली काढले. 

खंडपीठाने म्हटले की, अस्तित्व संकटात आलेल्या देशी गायींच्या रक्षणासाठी याचिकाकर्ते राज्य सरकारांकडे दाद मागू शकतात. देशी गायींच्या रक्षणाबाबत केंद्र व राज्यांनी घेतलेल्या सामायिक भूमिकेचा राष्ट्रीय हरित लवादाने विचार केला होता. त्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लक्ष वेधले. देशी गायींच्या रक्षणासाठी याचिकादारांनी राज्य सरकारकडे प्रयत्न करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

 

Web Title: Court's refusal to order ban on cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.