भावजय आणि पतीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून पुतणीची हत्या

By Admin | Published: May 20, 2016 09:09 AM2016-05-20T09:09:31+5:302016-05-20T14:24:06+5:30

एका २२ वर्षीय महिलेने पुतणीची हत्या करुन तिचा मृतदेह बिछान्याखाली लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या मुस्तफाबाद भागातील एका घरात घडली आहे.

Cousin murdered by rage of brother-in-law and husband's immoral relationship | भावजय आणि पतीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून पुतणीची हत्या

भावजय आणि पतीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून पुतणीची हत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - एका २२ वर्षीय महिलेने पुतणीची हत्या करुन तिचा मृतदेह बिछान्याखाली लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या मुस्तफाबाद भागातील एका घरात घडली आहे. रोशन जहान असे आरोपी महिलेचे नाव आहे. आयशा या आपल्या पुतणीची हत्या केल्यानंतर तिचे अपहरण झाल्याचा बनाव रचून रोशनने पोलिसांचीही दिशाभूल केली. 
 
शेजा-यांना रोशनच्या घरातून  दुर्गंधी येऊ लागली म्हणून त्यांनी रोशनच्या घरातून वास कुठून येत आहे त्याचा शोध घेतला असता बिछान्याखाली आयशाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी रोशनला अटक केली आहे. आपल्या पतीचे आणि भावजयीचे अनैतिक संबंध आहेत. आपण त्या दोघांना नको त्या अवस्थेत पकडले होते. त्याचा राग मनात होता. आपल्या पतीबरोबर असलेल्या संबंधांचा बदला म्हणून आपण भावजयीच्या मुलीची हत्या केली असे रोशनने पोलिसांना सांगितले. 
 
रोशनने आयशाला जूस देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिला गळा आवळून ठार मारले. आयशाची आई तिला शोधत घरी आली तेव्हा रोशनने आपण आयशाला बाजाराच्या दिशेने जाताना पाहिले तिथूनच तिचे अपहरण झाले असावे असे सांगितले. 
शेजा-यांनी आयशाला तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले तेव्हा तिने उंदीर मेला आहे असे सांगितले.
 
जेव्हा वास उग्र झाला तेव्हा शेजा-यांनी घरात शोध घेतला असता आयशाचा मृतदेह सापडला. आयशाची हत्या झाली तेव्हा तिचे आई-वडील खरेदीसाठी बाहेर गेले होते. रोशनचा नवरा लग्नासाठी बिजनौरला गेला होता. कोणीही आयशाजवळ नसल्याची संधी साधून रोशनने आयशाची हत्या केली. 
 

Web Title: Cousin murdered by rage of brother-in-law and husband's immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.