गुड न्यूज! कोरोनाच्या पहिल्या भारतीय लसीची मानवी चाचणी सुरु; पुण्याचा मोठा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 06:47 PM2020-07-14T18:47:58+5:302020-07-14T20:41:44+5:30
COVAXIN: नियोजित वेळापत्रकानुसार या 10 जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. लस घेतल्यानंतर त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत.
पटना: देशात कोरोनाने थैमान घातले असून बाधितांचा आकडा 9 लाखांवर पोहोचला आहे. मात्र, मृतांची संख्या कमी असल्याने काहीसा ताण कमी झाला आहे. आता पटनावरून आणखी एक चांगली बातमी येत आहे. देशाच्या पहिल्या कोरोना लसीची (COVAXIN) माणसांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली असून पटन्याच्या एम्समध्ये प्रयोग सुरु आहेत.
कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पटना एम्स (AIIMS-Patna) मध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या 10 जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, असे ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे. यानुसार कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरिक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर 14 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार या 10 जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. लस घेतल्यानंतर त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत. आयसीएमआरने कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी निवडलेल्या 12 संस्थांपैकी पटनाचे एम्स एक आहे. पटना एम्सचे अधीक्षक डॉ. सीएम सिंग यांनी आधीच वृत्तपत्रांना सांगितले होते की, कोरोनाची लस ही 22 ते 50 वयोगटातील सुदृढ लोकांवरच वापरून पाहिली जाणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुषही असणार आहेत.
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी टाईम्स नाऊला सांगितले की, SARS-CoV-2 विषाणूविरोधात कोव्हॉक्सिन परिणामकारक ठरण्याचा विश्वास आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) 200 दशलक्ष लसी बनविण्याच्या तयारीला लागली आहे. ही कोव्हॅक्सिन लस हैदराबादच्या जिनोमी व्हॅलीतील प्रकल्पामध्ये बनविण्यात येत आहे. प्राण्यांवर या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच बोलती बंद
'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार
Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार
काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर
रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही
क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार