"कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:45 AM2021-05-13T07:45:32+5:302021-05-13T08:00:09+5:30

covaxin : आमचे 50 टक्के कर्मचारी कोरोनामुळे कामावर येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही कोरोना साथीमध्ये 24 तास काम करत आहोत, असे ट्विट सुचित्रा एला यांनी केले आहे.

covaxin covid- 19 vaccine bharat biotech jmd suchitra ella tweets on supply to various states | "कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी

"कर्मचारी कोरोना संक्रमित, तरीही 24 तास काम करत आहोत", 'त्या' तक्रारींबाबत 'भारत बायोटेक'ची नाराजी

Next
ठळक मुद्दे1 मे पासून जवळपास 18 राज्यांत कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात येत असल्याचे  भारत बायोटेकने म्हटले आ

नवी दिल्ली : कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन उपलब्ध नसल्याच्या काही राज्यांच्या तक्रारींबाबत भारत बायोटेकने नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीच्या सह-संस्थापक डॉ. सुचित्रा एला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनीचे कर्मचारी कोरोना संक्रमित असूनही साथीची स्थिती लक्षात घेता कंपनी कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासंदर्भात कोणतीही हलगर्जीपणा घेत नाही. तसेच, 1 मे पासून जवळपास 18 राज्यांत कोरोनावरील लस कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात येत असल्याचे  भारत बायोटेकने म्हटले आहे. (covaxin covid- 19 vaccine bharat biotech jmd suchitra ella tweets on supply to various states)

आम्ही लसीचा पुरवठा सुरुळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी सुद्धा काही राज्य आमच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, हे निराशाजनक आहे. आमचे 50 टक्के कर्मचारी कोरोनामुळे कामावर येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही कोरोना साथीमध्ये 24 तास काम करत आहोत, असे ट्विट सुचित्रा एला यांनी केले आहे. याचबरोबर, ज्या राज्यांमध्ये भारत बायोटेकची लस पुरवली जाते आहे. त्या राज्यांची नावेही सुचित्रा इल्ला यांनी दिली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तमिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

दरम्यान, केंद्राकडून मिळालेल्या आदेशानुसार भारत बायोटेक कंपनी 1 मे पासून राज्यांना लसीचा पुरवठा करत आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, तिसऱ्या टप्प्यात होणारी लसीची एकूण निर्मितीचा 50 टक्के हिस्सा केंद्राला तर उरलेला 50 टक्के हिस्सा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीचे निर्देश देण्यात आले आहेत.

("आता केवळ आत्महत्या करणे बाकी आहे", व्हेंटिलेटर चालू नसल्यामुळे भाजपा आमदाराचा संताप)

आता लहान मुलांच्या कोव्हॅक्सिनची दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार
अमेरिकेने 12 ते 15 वयोगटाच्या मुलांसाठी फायझरच्या लसीला लसीकरणासाठी (Corona Vaccination)परवानगी दिलेली असताना आता भारतातूनही एक आनंदाची बातमी येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लहान मुलांसाठी भारत बायोटेक लस बनवत आहे. 2 ते 18 वयोगटातील बालके आणि मुलांच्या या लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्य़ा टप्प्यातील चाचण्यांसाठी एक्सपर्ट समितीने मंगळवारी शिफारस केली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीची चाचणी दिल्ली आणि पटनाच्या एम्समध्ये आणि नागपुरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसह विविध ठिकाणी केली जाणार आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) च्या कोरोनावरील तज्ज्ञांच्या समितीने मंगळवारी भारता बायोटेकने दिलेल्या अर्जावर चर्चा केली. यामध्ये भारत बायोटेकने बनविलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दोन ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये सुरक्षा आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह अन्य गोष्टींचे आकलन करणे आणि चाचणीच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्प्याला परवानगी देणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. 

Web Title: covaxin covid- 19 vaccine bharat biotech jmd suchitra ella tweets on supply to various states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.