अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:35 PM2020-07-05T21:35:08+5:302020-07-05T21:57:23+5:30
CoronaVirus vaccine गेल्या आठवड्यात आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतीय रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले होते. शिवाय ही लस बनविणाऱ्या कंपनीला आणि हॉस्पिटलांना आयसीएमआरने रुग्णांवरील चाचणी प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना केल्या होत्या.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील भारतीय लस ही देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आधीच बाजारात येणार असल्याचा दावा आयसीएमआरने केला होता. मात्र, यावर काही संघटना आणि विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत असतानाच आता विज्ञान मंत्रालयाने हा दावाच खोडून काढला आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत आयसीएमआरचा दावा खोडून काढताना सांगितले की 2021 पर्यंत लसीच्या वापरात येण्याची शक्यता नाहीय. याआधी गेल्या आठवड्यात आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतीय रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले होते. शिवाय ही लस बनविणाऱ्या कंपनीला आणि हॉस्पिटलांना आयसीएमआरने रुग्णांवरील चाचणी प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना केल्या होत्या. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, जगभरात 140 लसींपैकी 11 लसी या मानवी चाचण्यासाठी तयार आहेत. मात्र, पुढील वर्षापर्यंत या लसींद्वारे रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार करण्याची शक्यता नाहीय.
माणसांवर चाचणीसाठी 11 लसी तयार आहेत. यापैकी 2 लसी या भारतात बनविण्यात आल्या आहेत. एक आयसीएमआर आणि भारत बायोटेकने मिळून बनविली आहे. तर दुसरी झायडस कॅडिलाने बनविली आहे. तर 6 भारतीय कंपन्या लसीवर काम करत आहेत. आयसीएमआरची कोवॅक्सिन माणसावर चाचणी करण्याच्या टप्प्यात असून त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
ही कोरोनाच्या खात्म्याची सुरुवात असल्याचेही मंत्रालयाने म्हटले. कोरोनावरील लस ही अंधारामध्ये दिसणारा प्रकाशझोत आहे. यामुळे आशा निर्माण झाली आहे. भारत लसी बनविण्यात आधीही यशस्वी झाला आहे. युनिसेफला भारताकडून 60 टक्के लसींचा पुरवठा केला जातो.
विरोधकांचे आरोप
डाव्या पक्षांचे नेते सीताराम येच्युरी यांनी आयसीएमआरवर शरसंधान साधले होते. 15 ऑगस्टला कोरोनावरील लस यांना बाजारात आणायची आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी याची घोषणा करू शकतील. यामुळे घिसाडघाई सुरु आहे. यामुळे ही लस बनविताना जागतिक नियमांचे पालन केले जात नाहीय.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! एसटी महामंडळात कोरोनाने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302 रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा
पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह
गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार
राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत
WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली
पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित