Covid 3rd Wave: डॉक्टर म्हणाले ९८ दिवसांची असेल तिसरी लाट, आधीपेक्षा जास्त चिंताजनक स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 02:41 PM2021-07-08T14:41:02+5:302021-07-08T14:41:53+5:30
Covid - 19 Third wave : आतापर्यंतचे अंदाज सांगत आहे की, यूकेमध्ये याची सुरूवात झाली आहे आणि भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते.
यूकेमध्ये कोरोनाच्या थर्ड वेव्हची म्हणजे तिसऱ्या लाटेची (Covid - 19 Third wave) सुरूवात झाली आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचं (Delta Plus Variant) संक्रमण इथे वाढताना दिसत आहे. भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त संक्रमणाचं कारण ठरला होता. त्यामुळे भारतातही तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. एक्सपर्ट सांगतात की, दुसरी लाट ही ११ दिवसांची होती आणि तिसरी लाट ९८ दिवसांची असेल. आतापर्यंतचे अंदाज सांगत आहे की, यूकेमध्ये याची सुरूवात झाली आहे आणि भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते.
कोविड एक्सपर्ट डॉ. अंशुमान कुमार म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ११० दिवसांची होती. महाराष्ट्रात याचा प्रभाव कमी झाला त्यानंतर दिल्ली, यूपी, बिहार, बंगालमध्येही दुसरी लाट कमी झाली. हा व्हायरस नॅच्युरल नाहीये, हा एक बायोइंजिनिअर व्हायरस आहे. त्यामुळे यासाठी लावले जाणारे अंदाजही बरोबर ठरत आहे.
कुमार म्हणाले की, यूकेमध्ये तिसरी लाट सुरू होऊन १७ ते १८ दिवस झाली आहेत. त्यानंतर दीड-पावणे दोन महिन्यांनी भारतात नवीन लाट येईल. ही लाट ९८ दिवस राहील. ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास सुरू होऊ शकते. ते म्हणाले की, चिंतेची बाब ही आहे की, नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लस अजूनही पसरलेला आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! मास्क लावून रनिंग करणं तरूणाला पडलं महाग, असं की ज्याचा कुणी विचारही केला नसेल!)
तिसऱ्या लाटेबाबत कोविड एम्सचे कोविड एक्सपर्ट डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, तिसरी लाट दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एका म्हणजे व्हायरसची बिहेविअर, जे आपल्या हातात नाही. दुसरी बाब म्हणजे मनुष्याचं बिहेविअर, जे आपल्या हातात आहे. ज्याप्रमाणे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी दिसत आहे. ही फार फार चिंतेची बाब आहे. यातून हे स्पष्ट दिसतं की, मनुष्यांचं बिहेविअर व्हायरसला पसरण्यासाठी म्यूटेड होण्यासाठी आणि नव्या व्हेरिएंटला वाढण्यासाठी संधी देणारं आहे. जर अशीच स्थिती राहिली तर तिसरी लाट जास्त घातक ठरेल.
डॉ. नीरज म्हणाले की, 'अजूनही देशभरातून ४० हजार नव्या केसेस समोर येत आहेत. हे व्हायरसचं संक्रमण आहे, जे केवळ दिल्लीमध्ये कंट्रोल केल्याने थांबणार नाही. इथेही अजूनही रोज १०० रूग्ण आढळत आहेत. सत्य हे आहे की, देशातील दुसरी लाट अजून संपलेली नाही'. ते इंग्लंडचे क्रिकेटर पॉझिटिव्ह आल्याचं सांगत म्हणाले की, 'जर बायो बबलमध्ये राहूनही हे लोक संक्रमित होऊ शकतात तर मनालीतील गर्दीत लोक संक्रमित कसे होणार नाहीत?'. (हे पण वाचा : Corona Vaccine : वॅक्सीन न घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, एक्सपर्ट्सनी दिला इशारा!)
तर कुमार म्हणाले की, तिसरी यावरही अवलंबून आहे की, येणाऱ्या एका महिन्यात किती वेगाने वॅक्सीनेशन होतं. जर वॅक्सीनेशन वेगाने केलं गेलं तर तिसरी लाट बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करता येईल. इतकंच नाही तर डॉक्टर म्हणाले की, आतापर्यंत अनेक रिसर्चमध्ये बघण्यात आलं की, काही लोकांना वॅक्सीन घेतल्यावरही कोरोनाची लागण होत आहे. असे लोक संक्रमित झाले तर त्यांच्यावर प्रभाव कमी होईल. पण त्यांच्या संपर्कात येणारे संक्रमित होतात. त्यांच्यात म्यूटेशनचा धोकाही असतो.