Central Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! सरकारकडून 28 फेब्रुवारीपर्यंत 'ही' महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:57 PM2022-02-03T14:57:09+5:302022-02-03T15:01:39+5:30
Central Government Employees : अवर सचिव स्तरावरील आणि त्याखालील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष संख्येच्या 50 टक्क्यांपर्यंतच कार्यालयात येण्यास सांगितले असले तरी उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारत सरकारने (Central Government) आपल्या सर्व कार्यालयांमध्ये कोव्हिड-19 च्या (Covid 19) प्रतिबंधासाठी दक्षता घेत सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची (Cenrtal Government Employess) हजेरी, त्यांच्या कामाच्या वेळा आणि वर्क फ्रॉम होम किंवा कार्यालयात येण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सचिव स्तर आणि त्या खालील स्तरापर्यंतच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत.
यामध्ये अवर सचिव आणि त्यावरील स्तरावरील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, अवर सचिव स्तरावरील आणि त्याखालील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष संख्येच्या 50 टक्क्यांपर्यंतच कार्यालयात येण्यास सांगितले असले तरी उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही व्यवस्था पुढील 28 फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे.
भारत सरकारच्या (Indian Govt) कार्मिक मंत्रालयाने (ministry of personnel public grievances and pensions) जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, कोव्हिड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची सुरुवातीची चिन्हे लक्षात घेता, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या उपस्थितीच्या नियमांचे पुनरावलोकन केले गेले आहे आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू करण्यात आली आहे.
1) अवर सचिव स्तरावरील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती वास्तविक संख्येच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल आणि उर्वरित 50 टक्के घरून काम करतील. त्यानुसार सर्व संबंधित विभागांकडून रोस्टर तयार केला जाऊ शकतो.
2) अवर सचिव आणि त्यावरील स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना नियमितपणे कार्यालयात हजर राहावे लागेल.
3) अपंग व्यक्ती आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाईल, परंतु त्यांना घरून काम करणे आवश्यक आहे.
4) कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. जोपर्यंत कंटेनमेंट झोन डिनोटिफाई होत नाही तोपर्यंत.
5) जे अधिकारी कर्मचारी कार्यालयात येत नाहीत आणि घरून काम करत आहेत, ते दूरध्वनी आणि संपर्काच्या इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर नेहमी उपलब्ध असतील.
6) सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कोविडच्या योग्य वर्तनाचे काटेकोर पालन केले पाहिजे. जसे की वारंवार हात धुणे, सॅनिटायझेशन, फेस मास्क घालणे, नेहमीच सामाजिक अंतर पाळणे.
7) कामाच्या ठिकाणी, विशेषत: वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची योग्य स्वच्छता आणि वारंवार स्वच्छता सुनिश्चित केली जाईल. विभागप्रमुखांनीही कॉरिडॉर, कॅन्टीन इत्यादी ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
8) कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून अधिकारी, कर्मचारी निर्धारित वेळेचे पालन करतील, जसे की सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 आणि सकाळी 10 ते सायंकाळी 6:30 पर्यंत.
9) सर्व मंत्रालये/विभाग/कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या कोव्हिड योग्य पद्धतींवरील सूचनांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.