Coronavirus : कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:32 AM2021-06-20T11:32:11+5:302021-06-20T11:33:35+5:30
Coronavirus Updates India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात. ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.
Covid-19, Corinavirus in India Latest Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिस आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,९८,८१,९६५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दरही आता वाढला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry of India) माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ८१ दिवसांनंतर देशात ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान ८७,६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच १,५७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. सध्या देशात ७ लाख २९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
India reports 58,419 new #COVID19 cases (less than 60,000 after 81 days), 87,619 discharges & 1576 deaths in last 24 hrs as per Health Ministry
— ANI (@ANI) June 20, 2021
Total cases: 2,98,81,965
Total discharges: 2,87,66,009
Death toll: 3,86,713
Active cases: 7,29,243
Vaccination: 27,66,93,572 pic.twitter.com/MGYvftewvj
Recovery Rate increases to 96.27%, Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 3.43%. Daily positivity rate at 3.22% Ministry of Health
— ANI (@ANI) June 20, 2021
२७,६२ कोटींपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण
भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत २७.६२ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक (Corona Vaccine) लस देण्यात आली आहे. शनिवारी देशात ३३,७२,७४२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात १८ ते ४४ या वयोगटातील २०,४९,१०१ नागरिकांना शनिवारी लसीचा पहिला डोस, तर ७८,३४९ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.