Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 10:01 AM2021-05-17T10:01:04+5:302021-05-17T10:04:37+5:30

Coronavirus Updates : गेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट.

covid 19 new cases in india last 24 hours death toll coronavirus in india today health ministry updates lockdown | Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

Coronavirus : कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी

ठळक मुद्देगेल्या चोवीस तासांत तीन लाखांपेक्षाही कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, दिल्ली, महाराष्ट्रात रुग्णसंख्येत होतेय घट.

Coronavirus in India, Covid-19, Latest Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांत थोडी दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ३,७८,७४१ रुगांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४,१०६ रुगांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. तर दिल्ली आणि महाराष्ट्रातही रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.



आतापर्यंत देशात एकूण २,४९,६५,४६३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २,११,७४,०७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत कोरोनामुळे देशात २,७४,३९० रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात ३५,१६,९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या १८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला केंद्र सरकारनं परवानगी दिली. सध्या देशात १८,२९,२६,४६० नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली. 

Read in English

Web Title: covid 19 new cases in india last 24 hours death toll coronavirus in india today health ministry updates lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.