Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार? CSIR प्रमुखांनी सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:04 PM2021-08-01T17:04:53+5:302021-08-01T17:27:32+5:30
Covid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसून येत आहे. विशेषत: केरळ, तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा आलेख ज्या प्रकारे वर जात आहे, ते पाहून असे वाटते की ही कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) आहे. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट खरंच आली आहे का? असा सवाल उपस्थित होते आहे. यावर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) मोठा खुलासा केला आहे. सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर सी मांडे म्हणाले, कोरोना व्हायरची तिसरी लाट येणार हे निश्चित आहे, पण ती कधी येईल आणि लक्षणे काय असतील याचा अंदाज बांधता येत नाही. (next covid-19 wave definite but when how not known csir chief)
टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. तसेच, केरळमधील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे डेल्टा प्लस व्हेरिएंट जास्त चिंतेचा विषय नाही, असेही डॉ शेखर सी मांडे यांनी सांगितले.
डॉ शेखर सी मांडे म्हणाले, कोरोना व्हायरससाठी डेल्टा व्हेरिएंट वाईट आहे, परंतु डेल्टा प्लसबद्दल काळजी करण्याची गरज नाही. ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेने कोरोनाची पुढील लाट पाहिली आहे. आपल्याला संरक्षित दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. पुढची लाट येण्याची शक्यता आहे, पण कसे आणि केव्हा ते अजून माहीत नाही. या व्हायरसचा नवीन म्यूटेंट किंवा कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन करण्यात केले नाही, तिसऱ्या लाटेचे कारण ठरु शकेल.
सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी
कोरोनाची लस सामान्य लोकांवर पूर्णपणे काम करत आहे, यासाठी वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत. सध्या कोरोनाची लस तिसऱ्या लाटेचे एकमेव शस्त्र मानले जात आहे. सर्व लोकांनी शक्य तितक्या लवकर लस घ्यावी, जेणेकरून तिसऱ्या लाटेचा सामना करणे सोपे होईल. लसीसंदर्भात कोरोना व्हायरसची जीनोमिक पाळत ठेवणे पुढील तीन वर्षे सुरू राहील, असे डॉ शेखर सी मांडे यांनी सांगितले.
WHO च्या आधी कोविड -19 वर चर्चा केली होती
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) महामारी घोषित करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी आम्ही कोविड -19 वर चर्चा सुरू केली आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. सीएसआयआरच्या 37 प्रयोगशाळांमधील तज्ज्ञ सहभागी होते. आम्ही जीनोमिक, सीरो आणि सीवेज परिक्षण केले होते. आम्ही ड्राय स्वॅब पद्धतीसह डायग्नोस्टिक किट आणि चाचणी पद्धती विकसित केल्या आहेत, असेही डॉ शेखर सी मांडे म्हणाले.