नाकाद्वारे कोरोना लस; भारत बायोटेकच्या नेजल लसीचे लवकरच AIIMSमध्ये सुरु होणार क्लिनिकल ट्रायल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:20 AM2021-09-09T10:20:39+5:302021-09-09T10:21:22+5:30
covid-19 vaccine : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेकच्या नेजल लसीच्या (Nasal Spray Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे सुरू होणार आहेत. भारत बायोटेक कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी नियामक मान्यता गेल्या ऑगस्ट महिन्यात मिळाली होती. ही लस नाकाद्वारे दिली जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, या लसीची चाचणी पुढील एक किंवा दोन आठवड्यांत सुरू होईल. ही चाचणी सध्या एम्सच्या नीती समितीच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहे. या लसीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय असणार आहेत. चाचणी दरम्यान, स्वयंसेवकांना नेजल लसीचे दोन डोस 4 आठवड्यांच्या अंतराने दिले जातील. देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या नाकाद्वारे लसीचा चाचणी केली जात आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढला आहे. पॉझिटिव्हिटी रेट आता 0.9 वरून 1.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. #coronavirus#CoronaVirusUpdateshttps://t.co/uFcoUhJd59
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2021
पहिल्या टप्प्यातील परिणाम
दरम्यान, ही लस BBV154 आहे, ज्याची माहिती सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून भारत बायोटेकला मिळाली आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या पहिल्या टप्प्यात निरोगी स्वयंसेवकांना दिलेल्या लसीचे डोस मानवी शरीराने चांगले स्वीकारले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच कोणतेही गंभीर प्रतिकूल प्रभावाची माहिती नाही. पूर्व-क्लिनिकल अभ्यासातही ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले. प्राण्यांच्या अभ्यासात, लस उच्च पातळीवरील प्रतिपिंडे तयार करण्यात यशस्वी झाली.
किती प्रभावी आहे लस?
शास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल लस नाकातील म्यूकस मँबरेनचे संरक्षण करेल. यामुळे संपूर्ण पोट किंवा पोटावर विषाणूंपासून संरक्षणात्मक कवच तयार होते. त्यामुळे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की. नाकाद्वारे होणारे संसर्ग टाळण्यासाठी कोविड-अनुरूप वर्तन स्वीकारणे फार महत्वाचे आहे.