Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:57 IST2021-05-24T15:48:31+5:302021-05-24T15:57:04+5:30
Corona Vaccination : लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या.

Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या लसीसंदर्भात (Covid-19 Vaccine)एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक ऑनलाइन नोंदणीशिवाय देखील कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. 18 ते 44 वर्षांच्या लोकांना आता लसीकरण केंद्रातही नोंदणी करता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल. दरम्यान, 1 मेपासून केंद्र सरकारने 18 ते 44 वर्षांच्या लोकांना लस देण्यास परवानगी दिली आहे.
लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये दोन प्रकारच्या अडचणी येत होत्या. पहिली म्हणजे गावातील लोकांकडे स्मार्टफोन नव्हते, त्यांना स्लॉट बुक करण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय, अनेक राज्यांमधून अशाही बातम्या येत होत्या की, लोक स्लॉट बुकिंग करूनही लसीकरणासाठी केंद्रावर पोहोचत नाहीत. तर अशा परिस्थितीत ही लस वाया जाणार होती, परंतु आता ही उर्वरित लस नोंदणीशिवाय आलेल्या लोकांना दिली जाणार आहे.
राज्यांना आदेश
ऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत. यासह मंत्रालयाने राज्यांना असेही सांगितले की, स्वाक्षरी नोंदणी दरम्यान कोणतीही गर्दी होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.
(55 सेंकदाच्या 'या' व्हिडिओमध्ये असे काय आहे, जो 5 कोटींना विकला?)
आतापर्यंत 19 कोटींहून अधिक डोस
आतापर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 19.60 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सध्या बर्याच राज्यात लसीची कमतरता आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस दिली जात नाही.
भारतात सध्या तीन लस
सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकद्वारे बनविलेली कोव्हॅक्सिन लस नागरिकांना देण्यात येत आहे. याशिवाय, रशियाचा स्पुतनिक-व्ही काही राज्यांमध्येही उपलब्ध आहे.
"घरीच कोरोना टेस्ट करणाऱ्या CoviSelf किटचे उत्पादन वाढणार, दर आठवड्याला तयार होणार 10 कोटी युनिट्स"
पुढील काही महिन्यांत मागणीनुसार होम-बेस्ड कोरोना टेस्ट किटच्या आठवड्यातून दहा कोटी युनिट उत्पादन करण्याची क्षमता विकसित करण्यात येणार आहे, असे भारतीय डायग्नोस्टिक्स कंपनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने (मायलॅब) शुक्रवारी म्हटले आहे. मायलॅबचे सीईओ राहुल पाटील म्हणाले की, 'कंपन्याद्वारे निर्मित टेस्ट किटमध्ये सरकारी संस्था आणि कंपन्यांनी रस दाखविला आहे. कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय कोणताही व्यक्ती कोरोनाची टेस्ट करु शकते आणि हे खेड्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.'