कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:11 AM2020-07-22T10:11:00+5:302020-07-22T10:12:45+5:30

मश्जीद उघडू द्या अन् नमाज पठण करण्यास परवानगी द्या, केली मागणी.

COVID-19 will disappear if muslims allowed to offer namaz in mosques, says Samajwadi Party MP Shafiqur Rahman | कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

Next

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1 कोटी 50 लाख 96,317 इतकी झाली आहे. त्यापैकी 91 लाख 13,043 रुग्ण बरे झाले असून 6 लाख 19, 520 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 94,085 इतका झाला आहे. त्यापैकी 7 लाख 53,050 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 28,770 जणांचा जीव गेला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच देश लसींचा शोध लावत आहेत आणि काहींची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. पण, कोरोना हा आजार नसून अल्लाहनं आपल्या क्रुकर्माची दिलेली शिक्षा आहे, असे विधान समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान यांनी केलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी एक अजब लॉजिकही सांगितले.

बकरी ईदचा सण जवळ येत आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणी मश्जीद बंद आहेत. या पार्श्वभूमीवर शफीकुर रहमान यांनी अजब विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की,''बकरी ईदच्या निमित्तानं बाजारपेठा उघडल्या पाहिजेत. जेणेकरून लोकं बकरी खरेदी करून कुर्बानी देऊ शकतील. मश्जीद उघडल्या गेल्या पाहिजेत. तेथे लोकं एकत्र येऊन कोरोनाच्या नाश होण्यासाठी प्रार्थना करतील. कोरोनावर अजूनही कोणतेही औषध सापडलेले नाही. याचा अर्थ, हा आजार नव्हे, तर आपल्या चुकीच्या कामाची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे. त्यामुळे अल्लाहकडे प्रार्थना करणे, हाच त्यावरचा यशस्वी उपचार आहे.''


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मश्जीदीत नमाज पठण करण्यासाठी परवानगी देणे आणि कुर्बानीसाठी व्यवस्था करण्याची मागणी इस्लामी शिक्षण संस्थान दारुल उलून देवबंद यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यासंदर्भात पत्रही लिहीलं आहे.

Web Title: COVID-19 will disappear if muslims allowed to offer namaz in mosques, says Samajwadi Party MP Shafiqur Rahman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.