'हळू-हळू इन्फ्लूएंझासारखा होईल कोरोना, दरवर्षी लस घ्यावी लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:21 AM2021-07-10T09:21:17+5:302021-07-10T09:22:22+5:30

corona Virus : जर लोकांनी कोरोना संबंधित नियमांचे पालन केले नाही, तर तिसरी लाट 6-8 आठवड्यांत ठोठावू शकते, असाही तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

covid may become flu like endemic annual vaccines for at risk groups icmr xpert | 'हळू-हळू इन्फ्लूएंझासारखा होईल कोरोना, दरवर्षी लस घ्यावी लागेल'

'हळू-हळू इन्फ्लूएंझासारखा होईल कोरोना, दरवर्षी लस घ्यावी लागेल'

Next

नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोना महामारीचे (Coronavirus Pandemic) संकट ओढावले आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. असे असले तरी याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसानंतर कोरोना हा आजारही इन्फ्लूएंझासारखा (Influenza) होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच, लोकांना कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी लस घ्यावी लागू शकते, असे सांगण्यात आले आहे. सध्या देशात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी (Third Wave) तयारी सुरू आहे. जर लोकांनी कोरोना संबंधित नियमांचे पालन केले नाही, तर तिसरी लाट 6-8 आठवड्यांत ठोठावू शकते, असाही तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेशनल डिसीजचे प्रमुख समीरन पांडा म्हणाले की, काही काळानंतर कोरोना एंडेमिक स्टेजवर पोहोचण्याची शक्यता आहे. सेंटर्स फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल (CDC) मते, कोणत्याही भौगोलिक क्षेत्रातील लोकांमध्ये कोणताही रोग किंवा संसर्गजन्य एजेंटची उपस्थिती किंवा प्रादुर्भावाला एंडेमिक म्हणतात.

जेव्हा लहान व्हायरस वेगाने वाढतो, तेव्हा त्यांच्यात बदल होणे सामान्य आहे, असे समीरन पांडा म्हणाले. तसेच, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही काळानंतर कोरोनाचा व्हायरस इन्फ्लूएंझा सारखा एंडेमिक स्टेजवर पोहोचेल आणि त्यानंतर लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागेल. 100 वर्षांपूर्वी इन्फ्लूएंझा देखील साथीचा आजार होता, परंतु आज तो एंडेमिक आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनाच्या बाबतीतही आम्ही अशी आशा करतो की, हा सध्याच्या साथीच्या स्थितीतून हळूहळू बदलेल. सध्या आम्ही वृद्धांना वर्षाकाठी फ्लूची लस देण्याची शिफारस करतो. 'इन्फ्लूएंझा व्हायरस म्यूटेट करत राहतो, तसेच आम्ही लसीमध्ये किरकोळ बदल करत राहतो. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. उपलब्ध लस कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरुद्ध खूप प्रभावी आहेत, असे समीरन पांडा यांनी सांगितले.

लस संसर्गापासून संरक्षण देत नाही, परंतु रोग गंभीर होऊ देत नाही. आयसीएमआर येथे केलेल्या प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे की सध्या भारतात असलेल्या लस नवीन व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी आहेत. मात्र, वेगवेगळ्या स्ट्रेन्सवर याची कार्यक्षमतेत अंतर असू शकते, असे समीरन पांडा यांनी सांगितले. तसेच, या दरम्यान स्तनपान करणार्‍या मातांना लस घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लसीनंतर आईमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज स्तनपान दरम्यान बाळापर्यंत पोहचतील. तसेच, त्या मुलासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात, असे समीरन पांडा म्हणाले.

Web Title: covid may become flu like endemic annual vaccines for at risk groups icmr xpert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.