चिंता वाढली! गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा रुग्ण आढळला, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 10:48 AM2022-04-09T10:48:08+5:302022-04-09T10:48:46+5:30
XE Variant : देशातील XE व्हेरिएंटचे पहिले प्रकरण मुंबईत आढळून आले. म्हणजेच आता भारतात XE व्हेरिएंटची दोन प्रकरणे आढळून आली आहेत.
नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा आणखी एक रुग्ण भारतात सापडला आहे. गुजरातमध्ये हे नवीन प्रकरण समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या बाधित रुग्णाच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
देशातील XE व्हेरिएंटचे पहिले प्रकरण मुंबईत आढळून आले. म्हणजेच आता भारतात XE व्हेरिएंटची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. चीनमध्ये या नवीन व्हेरिएंटमुळे कोरोनाची नवी लाट आली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, या व्हेरिएंटचा पहिला रुपण ब्रिटनमध्ये 19 जानेवारी रोजी आढळला होता.
मुंबईतील एका 50 वर्षीय महिलेला या नवीन व्हेरिएंटची लागण झाली होती. मात्र, या महिलेला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत ही दिलासादायक बाब आहे. 10 फेब्रुवारीला ही महिला सौदी अरेबियातून परतली होती.
बीएमसीने सांगितले की सेरो सर्वेक्षणानुसार, मुंबईतून पाठवलेल्या 230 नमुन्यांपैकी 228 नमुने ओमायक्रॉनचे होते, तर एक कप्पा आणि एक एक्सई प्रकारचा होता. भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियमचे (INSACOG) तज्ज्ञ कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट शोधण्यासाठी नमुन्याचे जीनोम सीक्वेंसिंग करत आहेत.
अनेक देशांमध्ये पसरतोय XE व्हेरिएंट
डब्ल्यूएचओच्या मते, एक्स ई रीकांबिनेंट (BA.1-Ba.2) नावाचे नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट पहिल्यांदा 19 जानेवारी रोजी ब्रिटेनमध्ये आढळून आला होता. आणि तेव्हापासून 600 हून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. ओमायक्रॉनचा हा नवीन व्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या मागील व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्यातचे दिसून येत आहे.