Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:48 AM2021-06-28T10:48:09+5:302021-06-28T10:50:23+5:30

Corona Vaccine: जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोव्हिशिल्ड लसीला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या देशांमध्ये भारतीय प्रवाशांना प्रवेश मिळू शकणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

covishield may not be eligible for vaccine passport in european countries | Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

googlenewsNext
ठळक मुद्देकोव्हिशिल्डच्या लसीला युरोपीय संघाची मान्यता नाहीयुरोपीय देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय प्रवाशांपुढे प्रश्नचिन्हभारतातील एकूण लसीकरणात ८८ टक्के कोव्हिशिल्डची लसी

नवी दिल्ली: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आताच्या घडीला तरी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. भारतासह जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतात बहुतांश नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्डची लस दिली जात आहे. मात्र, या लसीमुळे परदेशी जाणाऱ्या प्रवाशांच्या चिंतेत भर पडणार असल्याची चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोव्हिशिल्ड लसीला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या देशांमध्ये भारतीय प्रवाशांना प्रवेश मिळू शकणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (covishield may not be eligible for vaccine passport in european countries)

भारतात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस लस मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आकडेवारीनुसार, एकूण लसीकरणांतर्गत ८८ टक्के कोव्हिशिल्डच्या लसी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे युरोपीय संघाच्या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय प्रवशांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, असे म्हटले जात आहे. 

“अदानींच्या कंपन्यांमध्ये कुणी पैसे गुंतवलेत, हे देशाला जाणून घ्यायचंय”

डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट आवश्यक

एका रिपोर्ट्सनुसार, कोव्हिशिल्ड लस घेतलेले प्रवासी हे युरोपीय संघातील देशांच्या 'ग्रीन पास' किंवा 'व्हॅक्सिनेशन पासपोर्ट'साठी पात्र ठरणार नाहीत. युरोपीयन संघात सहभागी असलेल्या अनेक देशांनी डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे. या पासपोर्टमुळे संबंधित व्यक्ती कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम असल्याचे प्रमाणित करेल, असे सांगितले जात आहे. युरोपीय देशांमध्ये कामासाठी, पर्यटनासाठी वा अन्य कारणांसाठी जाणाऱ्यांना डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट आवश्यक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. 

जगात ४ प्रकारचे दु:खी; शॉटगन सिन्हांनी शोधला मोदींशी संबंधित चौथा भन्नाट व्हेरिएंट

युरोपीय संघाची चार व्हॅक्सिनना मान्यता

युरोपीय मेडिसिन एजन्सीने आतापर्यंत चार कोरोना लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये फायझर, मॉर्डना, एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सनचा समावेश आहे. या चार लसींचे डोस घेतलेल्यांनाच युरोपीय संघांच्या देशांमध्ये प्रवेश मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. एस्ट्राजेनेका या लसीचे संस्करण असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीला मात्र युरोपीय संघात मान्यता देण्यात आलेली नाही. युरोपीय संघात एस्ट्राजेनेकाचे संस्करण असलेल्या वॅक्स्झर्वरिया या लसीला मान्यता असून, ती ब्रिटनमध्ये तयार केली जाते. 

“जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले गेले हे चांगलेच झाले, पण...”: राकेश टिकैत

दरम्यान, १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोव्हिशिल्डची लस देण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड लसीला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO मान्यता दिली आहे. परंतु, युरोपीय संघाने या लसीला मान्यता दिलेली नाही, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: covishield may not be eligible for vaccine passport in european countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.