कोविशिल्ड... कोरोनापासून वाचण्याची ढाल; जाणून घ्या सीरमच्या लसीकरणापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 04:52 AM2021-01-04T04:52:47+5:302021-01-04T05:12:57+5:30

Corona Vaccine : कोविशिल्ड लसीचे किमान पाच कोटी डोस आत्ता या क्षणी तयार आहेत. यातून आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखीम असलेले बाधित अशा एकूण अडीच कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे.

Covishield ... a shield to escape from the corona | कोविशिल्ड... कोरोनापासून वाचण्याची ढाल; जाणून घ्या सीरमच्या लसीकरणापर्यंतचा प्रवास

कोविशिल्ड... कोरोनापासून वाचण्याची ढाल; जाणून घ्या सीरमच्या लसीकरणापर्यंतचा प्रवास

googlenewsNext


सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला केंद्र सरकारने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. नवीन वर्षानिमित्त कोट्यवधी भारतीयांना मिळालेली ही भेट आहे. कोविशिल्ड लसीचे किमान पाच कोटी डोस आत्ता या क्षणी तयार आहेत. यातून आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखीम असलेले बाधित अशा एकूण अडीच कोटी लोकांचे लसीकरण करता येणार आहे. कोविशिल्ड कशी तयार होत आहे आणि काय आहे तिचे स्वरूप, जाणून घेऊ या...

लस कोण देईल?
पाच जणांचे पथक असेल
लसीकरण अधिकारी १ : नोंदणीची तपासणी करण्याचे काम या अधिकाऱ्याकडे असेल
लसीकरण अधिकारी २ : ऑथेंटिकेशनची जबाबदारी
लसीकरण अधिकारी ३ : लस देण्याची जबाबदारी हा अधिकारी पार पाडेल. लसीचे स्वरूप इन्ट्रामस्क्युलर असल्याने प्रशिक्षित व्यक्तीच मात्रा देण्याचे काम करेल
लसीकरण अधिकारी ४ आणि ५ : गर्दी नियंत्रण आणि लस दिल्यानंतरचे ३० मिनिटांचे निरीक्षण या जबाबदाऱ्या या अधिकाऱ्यांकडे असतील

लस तुम्हाला कोठे मिळेल?
विविध प्राधान्यक्रमानुसार लसीकरण केंद्रे निश्चित केले जातील. सरकारी तसेच खासगी आरोग्य केंद्रांमध्ये लस दिली जाईल. ठरावीक वेळेतच लसीकरण केले जाईल. वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टरांच्या उपस्थितीतच लस दिली जाईल. आरोग्य केंद्रांव्यतिरिक्त शाळा आणि समाज मंदिरांमध्येही लसीकरण मोहीम राबविली जाईल

विशेष भरारी पथके
n दुर्गम भागात तसेच स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये व आंतरराष्ट्रीय सीमारेषांजवळ राहणाऱ्या संवेदनशील प्रदेशांत विशेष भरारी पथके नियुक्त केले जातील
n या पथकांच्या माध्यमातून लसीकरण केले जाईल
n जिल्हा प्रशासन या पथकांची नियुक्ती करेल

  प्रक्रियेत काय असेल?
n लसीकरणासाठी विशेष खोली असेल
n एक प्रतीक्षालय असेल. ज्याला लस घ्यायची 
असेल ती व्यक्ती प्रतीक्षालयात थांबेल
n लसीकरण खोलीत तिला प्रवेश दिला जाईल
n निरीक्षण गृहाचीही व्यवस्था असेल
n लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला या 
निरीक्षण गृहात थांबावे लागेल
n लाभार्थ्याला लस घेतल्यानंतर काही 
दुष्परिणाम होतात किंवा कसे हे पाहण्यासाठी त्याच्यावर ३० मिनिटे लक्ष ठेवले जाईल

भारतासाठी हा गर्वाचा क्षण आहे. दोन्ही लसी योग्य प्रमाणात दिल्या जातील. आरोग्य कर्मचारी व कोरोनायोद्ध्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. 
    - डॉ. हर्ष वर्धन, 
    केंद्रीय आरोग्यमंत्री
प्रत्येकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा! कोविशिल्डच्या निर्मितीसाठी आम्ही जे कष्ट घेतले त्याचे चीज झाले आहे. कोविशिल्ड लस सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक असून तिच्या वितरणासाठी सीरम इन्स्टिट्यूट सज्ज झाली आहे. येत्या काही आठवड्यांतच या मोहिमेला सुरुवात होईल. 
    - अदर पूनावाला, 
    सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट

आमच्या प्रयत्नांना यश आले आहे. कंपनीच्या दृष्टीने ही मोठी झेप आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळणे, ही आमच्यासाठी नववर्षाची भेट आहे. कोव्हॅक्सिनच्या आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. 
    - कृष्णा इल्ला, 
    अध्यक्ष, भारत बायोटेक  

Web Title: Covishield ... a shield to escape from the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.