हवा शुद्धीकरणासाठी गाईचे शेण उपयुक्त, प्रदूषण थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 05:14 AM2019-11-16T05:14:13+5:302019-11-16T05:14:20+5:30

वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच.

Cow dung suitable for air purification, pollution will stop | हवा शुद्धीकरणासाठी गाईचे शेण उपयुक्त, प्रदूषण थांबणार

हवा शुद्धीकरणासाठी गाईचे शेण उपयुक्त, प्रदूषण थांबणार

googlenewsNext

सीमा महांगडे 
कोलकाता : वाढते प्रदूषण ही प्रत्येक शहराची समस्या बनत चालली असताना आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जीवनातील वापरही सततचा आहेच. मात्र इलेक्ट्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे आजूबाजूच्या वातावरणात सततच्या वाढणाऱ्या पॉझिटिव्ह आयन्समुळे आपल्याला थकवा येणे, डोकेदुखी, सुस्त वाटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे संशोधन पुढे आले आहे. मात्र हवेतील हे प्रदूषण कमी कारण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत गाईच्या शेणाच्या वापर केला तर ? ऐकून सुरुवातीला विचित्र वाटत असले तरी हे संशोधन लवकरच बाजारात येणार असून प्रायोगिक तत्त्वावरील त्याचा वापर सध्या भारतातील बंगळुरूसारख्या शहरात होत आहे. सीएसआयआर, बंगळुरूच्या आनंद कुमार, आर राजेंद्रन आणि आर के साकेत यांच्या टीमने हवेतील प्रदूषण आणि विशेषत: पॉझिटिव्ह आयन्स जे डोकेदुखी, थकवा यासाठी कारणीभूत ठरणाºया धन आयन आकर्षित करण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरीफायरचे संशोधन केले आहे,.
नुकतेच जपानच्या काही डॉक्टरांनी हवेतील या धनप्रभारांचा आपल्या आरोग्यावर कसा घातक परिणाम होत असतो यावर संशोधन समोर आणले आहे. आपल्या दैनंदिन वापरातील कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर हाय फ्रिक्वेन्सी डिव्हायसेसमुळे त्या हवेतील पॉसिटीव्ह आयन्सचा संचार आणि प्रमाण वाढते. हे आयन्स आपल्या रक्तातील पेशींवर परिणाम करतात आणि रक्ताची अ‍ॅसिडिटी लेव्हल वाढते. यामुळे लॅक्टिक अ‍ॅसिडिटी प्रमाण वाढण्याची शक्यता असून ते थेट कॅन्सरकडेही जाऊ शकते. याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असून यामुळे थकवा, सुस्ती, कंटाळा येणे, ताकद नसणे सारख्या गोष्टी आपल्याला वाटू लागतात. या सगळ्यावर एकूणच हवेतील या इलेक्रोमॅग्नेटीक फिल्डमुळे वाढणाºया पॉझिटिव्ह आयन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी बायोइलेक्ट्रिक प्युरिफायरचे संशोधन करण्यात आले आहे. या डिव्हाइसमध्ये गाईच्या शेणाचा वापर यात केलेला असल्यामुळे हवेतील बॅक्टरीया आणि व्हायरसेस आपल्याकडे आकर्षित करते आणि किमान हवा शुद्धीकरणास मदत करते.
>प्रदूषणाचा विळखा कमी होणार
या डिव्हाईसचा वापर कोठेही सहज केला जाऊ शकतो आणि सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एअर प्युरिफायरच्या केमिकल्सना हा उत्तम पर्याय ठरू शकणार आहे. केवळ गाईचे शेण आणि ?क्टिव्हेटेड कार्बन सारख्या सोप्या पद्धतींचा अवलंन असलेलय डिव्हाईसची किमंतही कोफायतशीर आहे. भारतीय सांस्कृतीतील पारंपरिक गोष्टी व पद्धतीचं आज आपल्याला वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढू शकणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी आरोग्यावर होणारे वाईट परिणाम नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकतात असा विश्वास आनंद कुमार यांनी व्यक्त केला.

Web Title: Cow dung suitable for air purification, pollution will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.