गोमुत्र पिताय? संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती; जाणून घ्या धोका अन् फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:05 IST2023-04-11T13:49:41+5:302023-04-11T14:05:30+5:30
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थानच्या (IVRI) एका रिसर्चमधून हा खूलासा करण्यात आला

गोमुत्र पिताय? संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती; जाणून घ्या धोका अन् फायदा
गोमूत्राचे फायदे तुम्ही आतापर्यंत ऐकलेच असतील. गोमुत्राच्या सेवनानं गंभीर आजारही बरे होतात असंही काही जणांचं म्हणणं असतं. पण देशातील नामवंत संस्था The Indian Council of Agricultural Research (ICAR) आणि इंडियन वेटेरिनरी रिसर्च इंस्टिट्यूटनं एक अभ्यास प्रकाशित केला आहे. ज्यात खुलासा करण्यात आला आहे की गाईच्या मुत्रापेक्षा म्हशीचे मुत्र माणसांसाठी अधिक चांगले असते.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थानच्या (IVRI) एका रिसर्चमधून हा खूलासा करण्यात आला आहे. या अभ्यासाचे प्रमुख भोजराज सिंह यांनी तीन पीएचड विद्यार्थांनाही यात सहभागी करून घेतले. या संशोधनात असेही समोर आले आहे की निरोगी गायींच्या दुधात किमान 14 प्रकारचे जीवाणू आढळतात. त्यात Escherichia coli ची उपस्थिती देखील आढळते, ज्यामुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. हे संपूर्ण संशोधन रिसर्चगेट या ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले आहे.
आयव्हीआरआयच्या एपिडेमियोलॉजी विभागाचे एचओडी भोजराज सिंह यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी विशेष संवाद साधताना सांगितले की, ''या संपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष काढण्यासाठी आम्ही गाई आणि म्हशींचे 73 मूत्र नमुने गोळा करून सांख्यिकीय संशोधन केले आहे. ज्यामध्ये आम्हाला आढळले की गोमूत्रापेक्षा म्हशीचे मूत्र जास्त फायदेशीर आहे. S Epidermidis आणि E Rhapontici सारखे जीवाणू म्हशीच्या लघवीमध्ये अधिक प्रभावी असतात.''
या संपूर्ण संशोधनात अभ्यासकांनी तीन प्रकारच्या गायींचे लघवीचे नमुने गोळा केल्याचे संशोधनात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या संशोधनात साहिवाल, थारपारकर, विंदवी या प्रजातीच्या गायी होत्या. यासोबतच म्हशी आणि माणसांचे लघवीचे नमुनेही घेतले. गेल्या वर्षी जून ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत तज्ज्ञांनी या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला. या संपूर्ण संशोधनानंतर या निष्कर्षावर पोहोचले की निरोगी व्यक्तीच्या मूत्रातही धोकादायक जीवाणू असतात.
गाईचे दूध हे जीवाणूविरोधी असते. पण याचा अर्थ आपण गोमूत्र सेवन करावे असा अजिबात नसावा. संशोधनानुसार मानवांसाठी फारसे चांगले नाही. गायीच्या प्युरिफाईड युरीनमध्ये अत्यंत घातक बॅक्टेरिया असतात की नाही यावर संशोधन सुरू असल्याचेही भोजराज सिंह यांनी स्पष्ट केले. आयव्हीआरआयचे माजी संचालक आर.एस. चौहान यांनी सांगितले होते की, प्युरिफाईड गोमूत्र कर्करोग आणि कोविडशी लढण्यासाठी प्रभावी आहे.