माकप, भाकपचे विलीनीकरण अटळ

By Admin | Published: April 20, 2015 12:26 AM2015-04-20T00:26:51+5:302015-04-20T00:26:51+5:30

भविष्यात माकप व भाकप या दोन पक्षांचे विलीनीकरण नक्की होईल; परंतु हे विलीनीकरण नेमके केव्हा होईल, हे मात्र सांगता येणार नाही,

CPI (M), CPI's merger is unavoidable | माकप, भाकपचे विलीनीकरण अटळ

माकप, भाकपचे विलीनीकरण अटळ

googlenewsNext

विशाखापट्टणम : भविष्यात माकप व भाकप या दोन पक्षांचे विलीनीकरण नक्की होईल; परंतु हे विलीनीकरण नेमके केव्हा होईल, हे मात्र सांगता येणार नाही, असे माकपचे नवनिर्वाचित सरचिटणीस व ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर येचुरी येथे पत्रकारांशी बोलत होते.
माकपने आपल्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये येचुरी यांच्यासोबतच ९१ सदस्यांची केंद्रीय समिती व १६ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोचीही निवड केली आहे. येचुरी म्हणाले, ‘माकप आणि भाकपचे विलीनीकरण अवश्य होईल; परंतु त्याआधी पक्ष बळकट बनविणे हा आमचा पहिला मुद्दा आहे. या बळकटीच्या आधारावरच डाव्या शक्तींच्या ऐक्यासाठी काम केले जाईल व त्याआधारे डावे आणि लोकशाहीवादी शक्तींचीही एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाईल.’
विलीनीकरणासाठी कोणतीही कालमर्यादा नाही; परंतु आम्ही लवकरात लवकर विलीनीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यात दोन महिने वा सहा महिनेही लागू शकतात; परंतु विलीनीकरण नक्की होईल. हा आमचा दृढसंकल्प व अभिवचनही आहे, असे सीताराम येचुरी म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: CPI (M), CPI's merger is unavoidable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.