त्रिपुरात हिंसाचार; सीपीएमच्या कार्यालयांना आग, पक्षाचा भाजपच्या जमावावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:45 AM2021-09-09T00:45:29+5:302021-09-09T00:48:14+5:30

भाजपकडून आरोपांचं खंडन.

CPM Offices Set On Fire In Agartala Party Blames BJP Mobs | त्रिपुरात हिंसाचार; सीपीएमच्या कार्यालयांना आग, पक्षाचा भाजपच्या जमावावर आरोप

त्रिपुरात हिंसाचार; सीपीएमच्या कार्यालयांना आग, पक्षाचा भाजपच्या जमावावर आरोप

Next
ठळक मुद्देभाजपकडून आरोपांचं खंडन.

त्रिपुरामधील कथलिया येथे बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या मिरवणुकीत कथितरित्या हिंसाचार घडला. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी माकप कार्यालयाची तोडफोड केली आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केले. केंद्रीय राज्यमंत्री आणि त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातील भाजप खासदार प्रतिमा भौमिक त्या मिरवणुकीचं नेतृत्व करत होत्या, ज्यामध्ये मोठा हिंसाचार घडला, अशी प्रतिक्रिया यानंतर माकपचे नेते बिजन धर यांनी दिली.

"प्रतिमा भौमिक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आपल्या पक्षाच्या कार्यालयाला लक्ष्य करण्याक आलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक समितीच्या अडीच वर्षांपासून बंद असलेल्या कार्यालयात तोडफोड केली. त्या ठिकाणी असलेल्या एका वाहनाला देखील आग लावली," असं बिजन धर म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत कारवाईचीदेखील मागणी केली आहे. 


दरम्यान, भाजपनं या सर्व आरोपांचं खंडन केलं. "या हिंसाचारादरम्यान आपण मुख्य सचिव कुमार आलोक आणि वरिष्ठ पोली अधिकाऱ्यांतडे मदत मागितली. परंतु अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली नाही. जवळपास एकावेळ ८-१० ठिकाणी भाजपच्या लोकांनी हिंसाचार केला," असा आरोप त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला.
 
भाजपकडून माणिक सरकारवर आरोप
भाजप प्रवक्ता नबेंदु भट्टाचार्जी यांनी माणिक सरकारवर "शांततापूर्ण राज्यात हिंसाचार भडकावण्याचा" आरोप केला. "सोमवारी माणिक सरकार यांनी आपलं विधानसभा क्षेत्र धनपुरचा दौरा करताना सीपीएम कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी उकसवलं होतं. माकपच्या कार्यकाळात २५ वर्षांमध्ये जो हिंसाचार नियमित झाला तो राजकीय हिंसाचार लोकांना आता नकोय," अशी प्रतिक्रिया भट्टाचार्जी यांनी दिली.   

Web Title: CPM Offices Set On Fire In Agartala Party Blames BJP Mobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.