हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला दोन दिवसात ६ घटना : तरुणाईचे समुपदेशन करण्याची गरज
By admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:03+5:302016-04-05T00:15:03+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ स्वरुपाच्या कारणाने तरुणांच्या गटात होणार्या मारहाणीमुळे भविष्यात दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी तरुणाईचे समुपदेशन केले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Next
ज गाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ स्वरुपाच्या कारणाने तरुणांच्या गटात होणार्या मारहाणीमुळे भविष्यात दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी तरुणाईचे समुपदेशन केले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.तरुणांमध्ये घडणार्या हाणामारीच्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यस्थेला गालबोट लागत आहे. असे असताना पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर संबंधिताची फिर्याद अथवा तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांकडून फारसे प्रयत्न होत नाही. तरुणांमध्ये झालेल्या वादातून शांततेला गालबोट लागल्याच्या घटनादेखील मागील एक ते दीड महिन्यांच्या काळात घडल्या. शनिपेठेतील दंगल याचेच उदाहरण आहे. तरुणांमधील वादातून पोलीस ठाण्याच्या आवारातच रात्री दंगल उसळली. त्यानंतरही ठोस उपाययोजना पोलीस प्रशासनाने केलेल्या नाहीत.दोन दिवसात सहा घटनागेल्या दोन दिवसाच्या काळात शहरात विविध ठिकाणी तरुणांमधील हाणामारीच्या तब्बल सहा घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यात १ एप्रिलला रात्री पावणे दहा वाजता सौरभ शिंपी व धीरज चिरमाडे या तरुणांना मारहाण झाली. त्यानंतर १०.३० वाजता विलास वराडे या बस चालकास गुजराल पेट्रोल पंपाजवळ दोघांनी मारहाण केली. २ एप्रिलला दुपारी ४.३० वाजता राहुल पाटील या तरुणाचे दगडाने डोके फोडले. याच दिवशी समतानगरात रात्री ११ वाजेच्या सुमारास अक्षय मौर्य या तरुणाला मारहाण झाली. ३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता टॉवर चौकात शाकीर शेख शकील उर्फ राजू या तरुणास ५ तरुणांनी बेदम मारहाण केली. तर रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयासमोर योगेश सपकाळे याला चार जणांनी मारहाण केली.उपाययोजना हव्यातशहरासह महामार्गावर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स, बिअरबार व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तरुण मद्यप्राशन करतात. त्यानंतर अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात. म्हणून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून हॉटेल्स लवकर बंद होतील, अशी उपाययोजना करायला हवी. रात्री चौका-चौकात तरुणांचे टोेळके थांबतात. त्यालाही प्रतिबंध घातला पाहिजे. धूम स्टाइल वाहनचालकांवरही नियंत्रण असायला हवे.