CoronaVirus News: गुंतवणुकीसाठी आकर्षक वातावरण तयार करा, अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी मोदींचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:49 AM2020-05-02T02:49:49+5:302020-05-02T02:50:09+5:30
विदेशी व देशी गुंतवणूक जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी व राज्यांनीही सुनियोजित पद्धतीने पावले उचलावीत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिले.
नवी दिल्ली : लॉकडाउन उठल्यावर भारताची अर्थव्यवस्था पुन्हा दमदारपणे उभी राहावी यासाठी विदेशी व देशी गुंतवणूक जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी व राज्यांनीही सुनियोजित पद्धतीने पावले उचलावीत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिले. वित्त, गृह आणि व्यापार व उद्योगमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोदी यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी कराव्या लागणाºया उपायांवर सविस्तर चर्चा केली. देशातील विद्यमान औद्योगिक वसाहती व औद्योगिक नगरींमध्येच अधिक पायाभूत सुविधा व वित्तीय मदत देण्यावरही भर देण्यात आला. देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी सन्मानाने पाचारण केले जावे, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात व त्यांना केंद्र व राज्यांकडून घ्याव्या लागणाºया सर्व मंजुºया वेळेत मिळतील यासाठी प्रभावी व्यवस्था करावी, असे मोदींनी सांगितले. राज्यांनाही यादृष्टीने प्रोत्साहित करून लागेल ते मार्गदर्शन करावे, असेही पंतप्रधान म्हणाले.
विविध मंत्रालयांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करण्याचे काम यापुढेही नेटाने सुरू ठेवावे व नवी गुंतवणूक व उद्योग उभारणी यासाठी अडथळा ठरू शकतील अशा गोष्टी कटाक्षाने दूर कराव्यात, असे निर्देशही मोदींनी दिले.
गेल्या सोमवारी मोदींनी मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ बैठक घेतली तेव्हाही विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सांगितले होते. शेकडो कंपन्या चीनमधून बाहेर पडून भारतात येण्याच्या विचारात आहेत. त्याप्रमाणे त्यांनी नक्की यावे यासाठी राज्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे मोदी
म्हणाले होते.