पतसंस्थांच्या संचालकांची मालमत्ता अज्ञात

By admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:40+5:302015-09-07T23:27:40+5:30

सहकार विभागाला लागेना शोध : ९६० कोटीच्या ठेवी परत

Creditors 'directors' assets are unknown | पतसंस्थांच्या संचालकांची मालमत्ता अज्ञात

पतसंस्थांच्या संचालकांची मालमत्ता अज्ञात

Next
कार विभागाला लागेना शोध : ९६० कोटीच्या ठेवी परत
पुणे : राज्यात अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांच्या संचालकांची मालमत्ता जप्त करुन ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न आहे. मात्र, यातील अनेक संचालकांनी आपली मालमत्ताच इतरांच्या नावावर केली आहे. त्यामुळे कर्जदारांकडील कर्ज वसूल करुनच ठेवी परत केल्या जाणार आहेत.
राज्यात एकूण ४६९ पतसंस्था अडचणीत सापडलेल्या आहेत. या संस्थांकडे सभासदांच्या एकूण १ हजार ६३२ कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात आंदोलन केल्यानंतर सहकार विभागाने या संस्थांवर व्यापक पातळीवर कारवाई सुरू करुन ठेवी परत देण्याचा प्रयत्न सुरू केला. या संस्थांपैकी १५० संस्था अडचणीत बाहेर पडल्या आहेत. सहकार विभागाने पाठपुरावा केल्यामुळे आजपर्यंत ९६० कोटी रुपयांच्या ठेवी नागरिकांना परत मिळालेल्या आहेत. उर्वरित ठेवी परत करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
यातील अनेक संस्था अवसायानात काढण्यात आलेल्या आहेत. संस्था अवसायानात निघाल्यानंतर संचालकांची मालमत्ता जप्त करुनही त्यातून ठेवी परत केल्या जातात. मात्र, अनेक संचालकांच्या नावे मालमत्ताच सापडायला तयार नाहीत. बहुधा संस्था अडचणीत आल्याचे लक्षात येतात अनेकांनी आपल्या मालमत्ता इतर नातेवाइकांच्या नावे हस्तांतरीत केल्या आहेत.
संचालकांच्या मालमत्ता सापडत नसल्याच्या वृत्तास सहकार विभागातील अधिकारी प्रदीप बर्गे यांनी दुजोरा दिला.
संचालकांच्या मालमत्ता सापडत नसल्याने अवसायकांनी आता कर्जवसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून उर्वरित ठेवी परत करण्याचा प्रयत्न आहे. या संस्थांतील संचालक व कर्मचारी मिळून तीन हजार व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेले आहेत.
----
.....................
पॅकेजचे दीडशे कोटी थकीत
पतसंस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने या संस्थांना २०० कोटी रुपयांचे कर्ज पॅकेज स्वरुपात देण्याची घोषणा केली होती. यातील १७४ कोटी रुपये संस्थांना वितरीत झालेले आहेत. मात्र, हे पैसेही पतसंस्थांनी परत केलेले नाहीत. यापैकी केवळ २२ कोटी रुपयांची रक्कम वसूल झालेली आहे.
......................

Web Title: Creditors 'directors' assets are unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.