आता टोमॅटोंपासून मालामाल होतोय धोनी, माहीच्या शेतातील टोमॅटो 40 रु. किलो, असा आहे गाईच्या दुधाचा भाव
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 24, 2020 08:37 PM2020-11-24T20:37:17+5:302020-11-24T20:41:33+5:30
ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. सोमवारपासून येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली. तर पुढच्या 20 दिवसांत पत्ता कोबी, बीन्नस, फूलकोभीदेखीलल बाजारात येणार आहे.
रांची - क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा महेंद्र सिंह धोनी आता शेतीतही हेलीकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. सोमवारपासून येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली. मात्र, सध्या धोनी कुटुंबीयांसह दुबईत आहे.
त्याच्या धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमधील ऑर्गनिक भाज्या बाजारात मिळू लागल्या आहेत. सध्या बाजारात केवळ टोमॅटो आणि दूध मिळत आहे. माहीच्या शेतातील टोमॅटोंना बाजारात 40 रु. किलो भाव असून. 80 किलो टोमॅटोंपैकी 71 किलो टोमॅटो विकले गेले आहेत. तर पुढच्या 20 दिवसांत पत्ता कोबी, बीन्नस, फूलकोभीदेखीलल बाजारात येणार आहे. एवढेच नाही, तर येथे स्ट्रॉबेरी आणि ब्रोकलीचीही शेती केली जात आहे.
धोनीच्या फार्ममधील भाज्यांची मार्केटिंग शिवनंदन करत आहेत. ते म्हणाले, धोनीने काही दिवसांपूर्वी भेटण्यासाठी बोलावले होते. तेव्हा तो म्हणाला, त्याच्या शेतात भाज्या आणि दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. याचे मार्केटिंग करायचे आहे. यानंतर अॅग्रिमेंट झाले आणि भाज्या विकायला सुरुवात झाली.
कडकनाथ कोंबड्यांचे उत्पादन, लवकरच मिळणार -
शिवनंदन यांनी सांगितले, येथील दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गाई आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गाईंच्या दूधाची विक्री बाजारात केली जात आहे. सध्या अपर बाजार, लालपूर, वर्धमान कंपाउंड येथे विक्री केली जात आहे. याशिवाय पीपी कंपाउंडमध्येदेखील लवकरच काउंटर सुरू करण्यात येतील. विशेष म्हणजे धोनीने आपल्या फॉर्म हाऊससाठी कडकनाथ कोंबड्यांची पिल्लंदेखील मागवली आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास 2 हजार कोंबडे आहेत.