क्रिकेटपटू प्रवीण कुमारचा समाजवादी पक्षात प्रवेश

By admin | Published: September 11, 2016 04:01 PM2016-09-11T16:01:18+5:302016-09-11T16:01:18+5:30

प्रवीण कुमार मेरठ विधानसभा मतदारसंघातून २०१७ सालची उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढवू शकतो.

Cricketer Praveen Kumar's entry into the socialist party | क्रिकेटपटू प्रवीण कुमारचा समाजवादी पक्षात प्रवेश

क्रिकेटपटू प्रवीण कुमारचा समाजवादी पक्षात प्रवेश

Next

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. ११ - क्रिकेटपटू प्रवीण कुमारने उत्तरप्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. प्रवीण कुमार मेरठ विधानसभा मतदारसंघातून २०१७ सालची उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढवू शकतो. प्रवीण कुमार मुळचा मेरठचा आहे. 
 
भारताच्या राष्ट्रीय संघाबाहेर असलेला प्रवीणकुमार सध्या आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचा सदस्य आहे. यापूर्वी तो किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांचा सदस्य होता. प्रवीण कुमारने सपामध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला पण पुढच्यावर्षीची निवडणूक लढवण्याविषयी तो काहीही बोलला नाही. 
 
स्विंग गोलंदाजी करण्यात माहिर असलेला प्रवीण कुमार ब-याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. भारताचा आणखी एक क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. कैफ काँग्रेसचा सदस्य असून, २०१४ साली अलहाबाद फुलपूरमधून त्याने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. 
 

Web Title: Cricketer Praveen Kumar's entry into the socialist party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.