क्राईम फोल्डर

By admin | Published: June 29, 2015 12:38 AM2015-06-29T00:38:14+5:302015-06-29T00:38:14+5:30

(((फोटो आहे..एन डोंगरे/ मिसींग बॉय)))

Crim folder | क्राईम फोल्डर

क्राईम फोल्डर

Next
(((
ोटो आहे..एन डोंगरे/ मिसींग बॉय)))
नागपूर : बेसा येथून बेपत्ता झालेला वैभव घागे (वय ११) हा बालक शेगावला गजानन महाराज मंदिर परिसरात सापडला. सहावीत शिकणारा वैभव सहा दिवसांपूर्वी बेसा परिसरातून अचानक बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्याचे नातेवाईक बुलडाणा, अकोला जिल्ह्यात असल्यामुळे तिकडच्या पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्याचे छायाचित्रही पाठविण्यात आले. शेगावला गजानन महाराज मंदिर परिसरात वैभव पोलिसांना दिसला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तशी माहिती नागपूरला कळवली. खात्री पटल्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
----
सीताबर्डीत महिलेची पर्स लंपास
नागपूर : सीताबर्डीतील बाजारातून भाग्यश्री निकेश बांते (वय २२, रा. अंबाझरी) या महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. रविवारी दुपारी १ वाजता त्या बाजारात आल्या. त्यांनी आपली पर्स स्कुटीच्या हुकला अडकवली. थोड्या वेळेसाठी त्यांची नजर दुसरीकडे गेली. तेवढ्या वेळेत बांते यांची पर्स चोरट्याने लंपास केली. या पर्समध्ये ७६ हजारांचे सोन्याचे दागिने होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
----
हुडकेश्वर फसवणूक
नागपूर : भूखंड विक्रीचा सौदा करून पुण्याच्या एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये घेेतल्यानंतर तोच भूखंड दुसऱ्या व्यक्तीला विकणाऱ्या हरीश रमेशपंत नवलाखे आणि रमेशपंत नरहरपंत नवलाखे (दोन्ही रा. सदावर्ती मोहल्ला, उमरेड) या बापलेकाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दिलीप लक्ष्मणराव प्रधान (वय ६३) सध्या रा. बानेर, पुणे येथे राहतात. ते मूळचे श्रीनगर, मानेवाडा येथील रहिवासी आहेत. आरोपी हरीश याचा बेसा येथे ३७०० फुटाचा भूखंड आहे.
नवलाखेने तो प्रधान यांना २४ लाख ४२ हजारात विकण्याचा सौदा केला. त्यापोटी ५ लाख रुपये घेतले. ६ फेब्रुवारी २०१३ ला हा व्यवहार झाला. मात्र, अलीकडे आरोपींनी हाच भूखंड धनंजय बेलखोडे यांना विकून त्यांच्याकडूनही १ लाख रुपये घेतले. ही फसवणूक उघड झाल्यानंतर प्रधान यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.
---

Web Title: Crim folder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.