आर्थिक शोेषण केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 14, 2014 01:17 AM2014-06-14T01:17:00+5:302014-06-15T01:31:10+5:30
अकोला: बँक खातेधारकाचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री रामदासपेठ पोलिसांनी सिंडीकेट बँकेच्या व्यवस्थापकासह कर्ज वसुली अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अकोला: बँक खातेधारकाचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री रामदासपेठ पोलिसांनी सिंडीकेट बँकेच्या व्यवस्थापकासह कर्ज वसुली अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बिर्ला कॉलनीमध्ये राहणारे श्रीकांत भगवानदास पटेल (५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक गणेश एस. अग्रवाल आणि बँकेतील कर्ज वसुली अधिकारी जी.एस. कुंभारे यांनी २६ ते २८ जून २0१२ दरम्यान संगनमत करून खोटे कागदपत्र तयार करून व त्या कागदपत्रांचा वापर करून देय नसलेली रक्कम गैरमार्गाने वसुली करून श्रीकांत पटेल यांचे आर्थिक शोषण केले. याप्रकरणी त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंंतु पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेतल्याने त्यांनी न्यायालयाकडे तक्रार केली. न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना गुुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक व कर्ज वसुली अधिकार्याविरुद्ध भादंवि कलम ४६४, ४६८, ४७१ नुसार गुुन्हा दाखल केला.