भगतसिंगांबद्दल अनुद्गार तुषार गांधीविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 10, 2015 10:39 PM2015-05-10T22:39:33+5:302015-05-11T08:26:20+5:30
शहीद भगतसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याविरुद्ध येथील पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
जालंधर : शहीद भगतसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याविरुद्ध येथील पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
तुषार गांधी यांनी एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने विधान केले. मुद्दाम असे विधान करताना त्यांचा हेतू वाईट होता, अशी तक्रार जनजागृती मंचाचे अध्यक्ष किशनलाल यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर २९५(ए)नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचेे जालंधरचे पोलीस निरीक्षक बिमल कांत यांनी सांगितले.
ब्रिटिशांच्या नियमानुसार भगतसिंग हे दोषी होते त्यामुळे महात्मा गांधी यांनी त्यांची शिक्षा निलंबित ठेवण्याची मागणी केली नव्हती, असे विधान तुषार गांधी यांनी केले होते. जनजागृती मंचाच्या सदस्यांनी जालंधरच्या पोलीस आयुक्तालयाला निवेदन देत तुषार गांधींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती.(वृत्तसंस्था)