माजी हवाईदल प्रमुखांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: July 5, 2014 05:19 AM2014-07-05T05:19:21+5:302014-07-05T05:19:21+5:30

हेलिकॉप्टर्सच्या ३६०० कोटींच्या सौद्यात लाचखोरीचा आरोप असलेले माजी वायुदलप्रमुख एस.पी. त्यागी आणि इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)मनी लाँड्रिंगचा शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे

Crime against former chief of air chief | माजी हवाईदल प्रमुखांविरुद्ध गुन्हा

माजी हवाईदल प्रमुखांविरुद्ध गुन्हा

Next

नवी दिल्ली : अगुस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सच्या ३६०० कोटींच्या सौद्यात लाचखोरीचा आरोप असलेले माजी वायुदलप्रमुख एस.पी. त्यागी आणि इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)मनी लाँड्रिंगचा (काळा पैसा पांढरा करणे) शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. या सौद्यात कुणाकुणाला लाच देण्यात आली यासंबंधी तपासाला वेग दिला जाणार आहे.
या सौद्यात ३६० कोटी रुपयांपेक्षा जास्त लाच देण्यात आल्याचा आरोप असून सीबीआयने मार्च २०१३ मध्ये एफआयआर दाखल करीत लाचखोरीचा छडा लावला होता. ईडीने याप्रकरणी विदेशी विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने एक वर्षाआधी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेत मनी लाँड्रिंग कायद्यातील विविध तरतुदींनुसार त्यागी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, युरोपीयन नागरिक कार्लो जेरासा, क्रिश्चियन मायकेल, गुड्डो हशके तसेच इटलीची फिनमेक्केनिका, ब्रिटनची अगुस्टा वेस्टलँड, चंदीगडची आयडीएस इन्फोटेक तसेच एअरोमॅट्रिक्स या चार कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
ईडीने एकूण १३ जणांचा एफआयआरमध्ये समावेश केला आहे. इटली आणि काही युरोपीयन देशांना विनंतीपत्रे पाठविण्यात आली असून लवकरच आरोपींचा जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मालमत्तेवर टाच आणणार
मनी लाँड्रिग कायद्यानुसार आरोपींच्या चल- अचल मालमत्तेवर टांच आणली जाणार आहे. लाचेचा पैसा हुडकून काढण्यासाठी गुन्हेगारी खटला दाखल करणे आवश्यक असून त्यासाठी विविध देशांसोबत असलेले सध्याचे करार आणि करासंबंधी आदान- प्रदान शिष्टचारानुसार सहकार्य घेतले जाणार आहे.
हा सौदा प्रत्यक्षात आणण्यासाठी अगुस्टा वेस्टलँडने लाच दिल्याचा आरोप इटालियन अधिकाऱ्यांनी केल्यानंतर या कंपनीच्या १२ हेलिकॉप्टरचा खरेदीचा सौदा सीबीआयच्या रडारखाली आला. घोटाळा प्रकाशात आल्यानंतर संपुआ सरकारने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हा सौदा रद्द केला. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने या कंपनीने बँकेत जमा केलेली २४०० कोटी रुपयांची हमीरक्कम काढून घेतली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Crime against former chief of air chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.