गहलोत, पायलट यांच्याविरुद्ध गुन्हा

By admin | Published: September 12, 2015 02:52 AM2015-09-12T02:52:44+5:302015-09-12T02:52:44+5:30

राजस्थानमधील अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याबाबत अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट

Crime against Gehlot, Pilot | गहलोत, पायलट यांच्याविरुद्ध गुन्हा

गहलोत, पायलट यांच्याविरुद्ध गुन्हा

Next

नवी दिल्ली : राजस्थानमधील अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्याबाबत अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट तसेच दोन माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्रांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा (काळा पैसा पांढरा करणे) गुन्हा नोंदवला आहे.
सीबीआयने यापूर्वी दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेत ईडीने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, वायलर रवी यांचे पुत्र रवी कृष्णा यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला.
गेल्या वर्षी जुलैमध्ये राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचे सरकार पदारूढ झाल्यानंतर या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Crime against Gehlot, Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.