ट्रेनर विमान खरेदी घोटाळ्यात संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:16 AM2019-06-23T06:16:27+5:302019-06-23T06:16:55+5:30

हवाई दलासाठी करण्यात आलेल्या पिलाटस प्राथमिक प्रशिक्षण विमान खरेदी घोटाळ्यात सीबीआयने कुख्यात शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

 Crime against Sanjay Bhandari in the trainer plane purchase scam | ट्रेनर विमान खरेदी घोटाळ्यात संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा

ट्रेनर विमान खरेदी घोटाळ्यात संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा

Next

नवी दिल्ली -  हवाई दलासाठी करण्यात आलेल्या पिलाटस प्राथमिक प्रशिक्षण विमान खरेदी घोटाळ्यात सीबीआयने कुख्यात शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. २00९ मध्ये ७५ प्रशिक्षण विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेला हा सौदा २,८९५ कोटी रुपयांचा होता.
सूत्रांनी सांगितले की, सीबीआयने भंडारी याच्या घरांवर छापे मारले आहेत. सध्या छापे थांबविण्यात आलेले आहेत. तीन वर्षांपूर्वी सीबीआयने केलेल्या तपासातून हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे सीबीआयने भंडारी याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हवाई दल, संरक्षण मंत्रालय आणि स्वीत्झर्लंडची पिलाटस एअरक्राफ्ट लिमिटेड कंपनी यांच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
स्वीस कंपनी पिलाटसने भंडारी आणि बिमल सरीन यांच्याशी षड्यंत्र रचून जून २0१0 मध्ये भंडारी याच्यासोबत सेवा पुरवठा करार केला होता. त्यामुळे संरक्षण खरेदी प्रक्रिया २00८ च्या नियमांचा भंग झाला आहे. भंडारी आणि सरीन हे आॅफसेट इंडिया सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. स्वीस कंपनीने आॅफसेट इंडिया सोल्युशन्सच्या नवी दिल्लीतील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतील खात्यावर आॅगस्ट आणि आॅक्टोबर २0१0 मध्ये दोन हप्त्यांत १0 लाख सीएचएफ (स्वीत्झर्लंडचे चलन) जमा केले होते. याशिवाय २0११ ते २0१५ या काळात ३५0 कोटी रुपये स्वीस फ्रँकच्या स्वरूपात दुबई येथील आॅफसेट इंडिया सोल्युशन्स एफझेडसी या कंपनीच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.

पैशांचे हस्तांतरण लपविले
ही कंपनीही भंडारी याच्याच मालकीची आहे. पिलाटसने केलेले या पैशाचे हस्तांतरण लपवून ठेवले होते. ही सर्व कमिशनची रक्कम असावी, तसेच भारतीय हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना यातील काही हिस्सा दिला गेला असावा, असा सीबीआयला संशय आहे.

Web Title:  Crime against Sanjay Bhandari in the trainer plane purchase scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.