सुनपेड प्रकरणी गुन्हा
By admin | Published: October 29, 2015 10:16 PM2015-10-29T22:16:31+5:302015-10-29T22:16:31+5:30
हरियाणाच्या सुनपेड गावात एका दलित कुटुंबातील दोन निष्पाप बालकांना कथितरीत्या जाळून ठार मारल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी ११ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
फरिदाबाद/ नवी दिल्ली : हरियाणाच्या सुनपेड गावात एका दलित कुटुंबातील दोन निष्पाप बालकांना कथितरीत्या जाळून ठार मारल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी ११ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
गेल्या २० आॅक्टोबरला दिल्लीपासून जवळच असलेल्या सुनपेड गावात हल्लेखोरांनी एका घराला आग लावल्याने या घरात माता-पित्यांसह शांत झोपलेला अडीच वर्षांचा वैभव आणि त्याची ११ महिन्यांची बहीण दिव्या हे दोघेही जिवंत जळाले होते. त्यांची आई रेखा व वडील जितेंद्रसिंग हे गंभीर जखमी झाले होते. हे जळीतकांड घडले त्यावेळी गावात धार्मिक कार्यक्रम सुरू होता. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सीबीआयने गुरुवारी तपास सुरूकरीत घटनास्थळी पाहणी करून न्यायवैद्यक पुरावे गोळा केले. (वृत्तसंस्था)