Crime: कॉलगर्लचं आमिष दाखवून फसवणूक, व्हॉट्सअॅपवर हॉट तरुणींचे फोटो पाठवायचे आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:41 PM2023-08-09T22:41:00+5:302023-08-09T22:41:22+5:30
Crime: पोलिसांनी मोठी कारवाई करत एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी कॉलगर्लचा पुरवठा करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
राजस्थानमधील उदयपूर येथील प्रतापनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी कॉलगर्लचा पुरवठा करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी कॉलगर्लच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असत. त्यासाठी आरोपींनी एक अॅप तयार केले होते. या अॅपच्या माध्यमातून आरोपी लोकांशी संपर्क साधत असत. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर कॉलगर्लचे फोटो पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असत. त्यानंतर संबंधित ग्राहकांना कारमध्ये बसवून बदमान करण्याची धमती देत. त्यानंतर त्यांना तलवारीचा धाक दाखवून पैसे उकळायचे.
याबाबत पोलीस अधिकारी हिमांशू सिंह राजावत यांनी सांगितले की, खबऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या गँगचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम बनण्यात आली. या टीममधील सदस्याला बनावट ग्राहक बनवून त्याच्या मोबाईलमधून संबंधिक अॅप चालवण्यात आले. अॅपवर मिळालेल्या नंबरवर संपर्क केला गेला. समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉलवर बोलण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी मुलींचे फोटो पाठवले. त्यानंतर बोगस ग्राहक बनलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने यातील एका मुलीचा फोटो निवडला आणि आरोपींना पाठवला.
त्यानंतर आरोपींनी त्याला भेटण्यासाठई सुखानाका रोडवर बोलवले. त्यावर पोलिसांच्या टीमने योजनाबद्ध पद्धतीने घटनास्थळावर सापळा रचला. तिथे एक जीप आणि कार उभी होती. बनावट ग्राहक बनलेला पोलीस कर्मचारी जीपजवळ पोहोचला, तेव्हा त्यातील एक आरोपी पुडे आला. त्याने त्या बनावट ग्राहकाला कारमध्ये बसवले. त्यानंतर दोन्ही वाहने तिथून निघून जात होती. त्यावेळी पोलिसांनी या दोन्ही वाहनांना अडवले आणि त्यांचा शोध घेतला.
या वाहनांमधून एक तलवार, १० मोबाईल, दोन हजार रुपये आणि दोन डायऱ्या सापडल्या. चौकशीमधून आरोपींची नावं प्रीतम सिंह राजावत, मनीष चौधरी, अशोक सैन, सुबराती खान आणि दीपक कुमार मीणा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पाचही आरोपांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.